Home Breaking News suicide : दोन दिवसांत दोघांनी संपवले जीवन

suicide : दोन दिवसांत दोघांनी संपवले जीवन

● दोघांच्या आत्महत्येने तालुका हादरला

C1 20231228 13095991

दोघांच्या आत्महत्येने तालुका हादरला

Sad News Maregaon : तालुक्यातील चिंचाळा या गावात वास्तव्यास असलेल्या 70 वर्षीय वृद्धाने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवार दिनांक 27 डिसेंबरला सायंकाळी 7:30 वाजता उघडकीस आली. तर मंगळवारी दुपारी हटवांजरी (पोड) येथील 40 वर्षीय व्यक्तीने सासऱ्याच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. दोन दिवसांत दोघांनी आत्मघाती निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. The heartache is being expressed as two of them took the decision to commit suicide within two days.

भाऊराव सदाशिव थेटे (70) असे मृतक वृद्धांचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह चिंचाळा या गावात वास्तव्यास होते. तर अंकुश महादेव मडावी (40) रा.खापरी (ह. मु. हटवांजरी पोड) सासुरवाडी येथे वास्तव्यास होता. शेतमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.

चिंचाळा येथील भाऊराव थेटे यांनी आपल्या घरीच विषारी द्रव प्राशन केले. ही बाब घरच्यांना कळताच त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले व पोलिसांना कळविण्यात आले. शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या पश्चात मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.

Img 20250103 Wa0009

अंकुश मडावी याने मंगळवार दिनांक 26 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास सासऱ्याच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. नातेवाईकांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यु झाला. त्याचा मागे पत्नी, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे
Rokhthok News