Home Breaking News शेतातील बंड्यातून 20 क्विंटल कापसाची चोरी

शेतातील बंड्यातून 20 क्विंटल कापसाची चोरी

● चोरट्यांच्या नजरा शेतकऱ्यांच्या शेतमालावर

C1 20240113 07282235
चोरट्यांच्या नजरा शेतकऱ्यांच्या शेतमालावर

Wani News :- शेतातील बंड्यात ठेवण्यात आलेला 20 क्विंटल कापूस चोरट्यानी लांबवला. याप्रकरणी शेतकऱ्याने शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 10 जानेवारीला उघडकीस आली. Thieves stole 20 quintals of cotton kept in the farm shed.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नायगाव येथील शेतकरी विलास झाडे यांचे पुनवट ते नायगाव रस्त्यावर शेत आहे. त्यांनी शेतीपयोगी साहित्य व शेतमाल ठेवण्यासाठी शेतात बंडा बांधला आहे.

खरीप हंगामात झाडे यांनी शेतात कपाशीची लागवड केली होती. त्यांनी शेतातून निघालेला 20 क्विंटल कापूस बंड्यात साठवून ठेवला होता. 10 जानेवारीला सकाळी नेहमी प्रमाणे ते शेतात गेले असता त्यांना कापसाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

Img 20250103 Wa0009

त्यांनी याप्रकरणी थेट शिरपूर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. शेतातील बंड्यात साठवून ठरलेला 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा 20 क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Rokhthok News