● शर्मिला राज ठाकरेंचे प्रतिपादन
● श्री शिवपुराण कथेचा घेतला आस्वाद
● “आनंदी” त्रिंबके यांच्या मुलीचे केले नामकरण
Mns News Wani : जगप्रसिद्ध पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या श्री महा शिवपुराण कथेकरिता गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांचे मनसे नेते राजू उंबरकर यांच्या निवासस्थानाजवळ भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, वणी विधानसभेचा पुढचा आमदार राजू उंबरकरच असेल. तर मनसेचे झुंजार कार्यकर्ते धनंजय त्रिंबके यांच्या मुलीचे “आनंदी”असे नामकरण केले. MNS president Raj Thackeray’s wife Sharmila Thackeray was present for the Shree Maha Shivpuran story on Thursday.
कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धर्मपत्नी शर्मिला ठाकरे ह्या उपस्थित होत्या. पंडित प्रदीप मिश्रा यांचे दर्शन घेऊन आयोजक राजकुमार जयस्वाल कुटुंबास शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावरून बोलताना हिंदू धर्माकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी अग्रेसर राहत आली आहे आणि यापुढे फक्त “आवाज” द्या मनसे संपूर्ण ताकदीने सोबत असेल असे अभिवचन याप्रसंगी दिले.
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून शिवपुराण कथेचा लाभ तर घेतलाच शिवाय महाराज यांचे आशीर्वाद घेतले.याप्रसंगी मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता उपस्थित होत्या. हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून अक्षरशः शर्मिला ठाकरे भारावून गेल्या आणि त्यांनी या उत्कृष्ट नियोजनाबाबत प्रमुख आयोजक राजकुमार जयस्वाल व श्रध्दा राजकुमार जयस्वाल यांचे कौतुक केले.
विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणी मतदारसंघात शर्मिला ठाकरे पहिल्यांदाच आल्याने त्यांचे मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात दिमाखदार स्वागत करण्यात आले. मतदारसंघांतील हजारो महिला आणि नागरिकांच्या वतीने शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय, नांदेपेरा रोड येथे छोटेखाणी सभाच घेण्यात आली. यावेळी संवाद साधताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, वणी विधानसभेचा पुढील आमदार राजू उंबरकरच असेल.
● धनंजय आणि अलकाची लेक “आनंदी” ●
वणी मतदारसंघांत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या अलका त्रिंबके ( टेकाम) आणि नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके यांना दोन महिन्या पूर्वी कन्यारत्न झाले. आज या दांपत्याने आपलीं कन्या शर्मिला ठाकरे यांच्या हाती सोपवली. तर मुलीचे नामकरण करण्याचा आग्रह केला. यावेळी त्या बाळाचा हसरा चेहरा बघून तिचे नाव “आनंदी” असे ठेवून आशीर्वाद दिले.
Rokhthok News