Home Breaking News वाघ व वाघिणीचा वावर, वनविभागाचे “रेस्क्यू” ऑपरेशन

वाघ व वाघिणीचा वावर, वनविभागाचे “रेस्क्यू” ऑपरेशन

● सुकनेगाव परिसरात वनविभागाचे पथक

1395
C1 20240204 11532127
Img 20241016 Wa0023

सुकनेगाव परिसरात वनविभागाचे पथक

Wani News : तालुक्यातील सुकनेगाव शिवारात वाघांच्या दोन पिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे परिसरात वाघ व वाघिणीचा वावर असल्याची खात्री परिस्थितीजन्य पुराव्यावरून वनविभागाला झाली आहे. वाघ, वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने “रेस्क्यू” ऑपरेशन राबवले असून सुकनेगाव परिसरात वनविभागाचे पथक सज्ज झाले आहेत. The forest department conducted a “rescue” operation to catch the tigress.

तालुक्‍यातील सुकनेगाव शिवारात असलेल्‍या तलावाजवळ दि. 31 जानेवारी व दि. 1 फेब्रुवारी ला अडीच महिने वय असलेली वाघाची दोन शावक वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्‍थेत आढळल्‍याने परीसरात एकच खळबळ उडाली होती. वन विभागाच्या पंचनाम्यानंतर त्या पिलांचा भूकबळीने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

सुकनेगाव शिवारात पिलांचे मृतदेह आढळल्याने वाघ, वाघिणीचा वावर असल्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये पसरली आहे. शेतकरी- शेतमजूर भयग्रस्त झाले आहेत. यामुळे वन विभागाच्या मारेगाव, झरी व वणी येथील पथकाकडून वन‍परीक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोनडवले यांच्या मार्गदर्शनात शोध मोहीम राबवली जात आहे.

सुकनेगाव परिसरात दोन शावकांचा मृत्यू व पायाचे ठसे आढळल्याने वाघ व वाघिणीचा वावर असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी यवतमाळ व पांढरकवडा येथील वनविभागाची चमू दाखल झाली आहे. त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविले जात आहे.

सुकनेगाव येथे ऑपरेशन सक्सेस करण्यासाठी उपवनसंरक्षक किरण जगताप (IFS) यांच्या मार्गदर्शनात सहा.वनसंरक्षक शंकर हटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोनडवले, टि.एन.सांळुंके, वंदना धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवार तसेच श्याम जोशी मानद वन्यजीव संरक्षक यवतमाळ यांची रेस्क्यु टीम दाखल झाली आहे. वनविभागाचे 10 दल व 40 लेबर परिश्रम घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ROKHTHOK NEWS