● अवैद्य व्यवसायाचे आव्हान
Wani News : तालुक्यातील महत्वाचे पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या शिरपूरचे ठाणेदार म्हणून सपोनि माधव शिंदे यांची वर्णी लागली. जिल्ह्यातील हेविवेट ठाणे म्हणून शिरपूर ची ओळख आहे. अनेक अवैद्य व्यवसायावर आळा बसविण्याचे आव्हान त्यांचे समोर आहे. API Madhav Shinde as Thanedar of Shirpur.
शिरपूर पोलीस ठाण्यात सहा महिन्या पूर्वी संजय राठोड यांनी ठाणेदार पदाचे सूत्र हाती घेतले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली अमरावती ग्रामीणला करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी वणी ठाण्यात कार्यरत असलेले API माधव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वसमावेशक वर्तन असल्याने शिंदे यांना ठाण्याचा प्रभार बघताना अडचण जाणवणार नाही. मात्र पोलीस ठाण्याच्या हद्दीतून होणारी गोवंश, सुगंधित तंबाखू तस्करी व कोळसाचोरी याकडे प्रामुख्याने लक्ष ठेवून तस्करांच्या मुसक्या अवळाव्या लागणार आहे.
Rokhthok News