Home Breaking News आणि…मंत्री सुधीर मुनगंटीवार शब्दाला “जागले”

आणि…मंत्री सुधीर मुनगंटीवार शब्दाला “जागले”

● बारा कोटी रुपयांचे रुद्राक्ष शिवबन वणीत ● मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा

C1 20240307 08565949

बारा कोटी रुपयांचे रुद्राक्ष शिवबन वणीत
मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा

Wani News | काही दिवसांपूर्वी वणी परिसरात भव्यदिव्य काशी महा शिवपुराण कथा संपन्न झाली. त्याप्रसंगी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रुद्राक्ष वन ( शिवबन) उद्यान वणीत साकारण्यात येईल असा शब्द दिला होता. आणि 12 कोटी रुपये खर्च करून शिवबनाची संकल्पना साकार होत आहे. गुरुवार दिनांक 7 मार्चला दुपारी दोन वाजता निंबाळा शिवारात वन विभागाच्या अधिनस्थ जमिनीवर भूमिपूजन होणार आहे. The concept of Shivbana is being realized by spending 12 crore rupees.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी परिसरातील नागरिकांना पर्यटनासाठी योग्य स्थळ असावं व नैसर्गिक वातावरणाचा लाभ व्हावा यासाठी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वन विभागाच्या माध्यमातून उत्कृष्ट उद्यान व्हावे याची गळ घातली होती. आमदार बोदकुरवार व लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर यांनी पाठपुरावा केला.

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांच्या प्रस्तावानुसार वणीजवळील निंबाळा (रोड) येथील वनविभागामध्ये वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वणीकरांना दिलेल्या शब्दानुसार रुद्राक्ष वन ( शिवबन) उद्यानाच्या प्रस्तावाला महसूल व वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याकरिता 11 कोटी 97 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या उद्यानात रुद्राक्ष वनस्पतीसह, बेल व इतर बहुउपयोगी वनस्पती व फुलझाडे लावून सौंदयीकरण केले जाणार आहे.

Img 20250103 Wa0009

आयोजित भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड तर उद्घाटक म्हणून वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे असणार आहेत. तर प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी (भा.प्र.से.), प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता (भा.व.से.), उपवनसंरक्षक (प्रादे.) पांढरकवडा किरण जगताप (भा.व.से.), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शैलेष टेंभुर्णीकर (भा.व.से.), वनसंरक्षक (प्रादे.)वसंत घुले (भा.व.से.), यवतमाळ वनवृत्त हे उपस्थित राहणार आहेत.
Rokhthok News