Home Breaking News “शिवानी”च्‍या उमेदवारीसाठी वडेट्टीवारांचा “हट्ट”

“शिवानी”च्‍या उमेदवारीसाठी वडेट्टीवारांचा “हट्ट”

● कार्यकर्त्‍या सोबतच मतदार संभ्रमात

2065
C1 20240319 20450298

कार्यकर्त्‍या सोबतच मतदार संभ्रमात

सुनील पाटील, वणी
Political News | चंद्रपुर-वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघ दोन्‍ही राष्‍ट्रीय पक्षाकरीता प्रतिष्‍ठेचा झालेला आहे. कॉग्रेसमुक्‍त महाराष्‍ट्राची इभ्रत केवळ चंद्रपुर-आर्णी लोकसभेने वाचवली होती. अनेक वर्ष भाजपाच्‍या ताब्‍यात असलेला गढ कॉग्रेस पक्षाने पुन्‍हा मिळवला होता. कॉग्रेस पक्षाजवळ तुल्‍यबळ उमेदवार असतांना विरोधी पक्षनेत्‍यांने पुञी “शिवानी”ला उमेदवारी मिळावी याकरीता पक्षश्रेष्‍ठी जवळ हट्ट धरला आहे. Chandrapur-Wani-Arni Lok Sabha Constituency has become prestigious for both the national parties.

चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभेचे राज्‍यातील एकमेव खासदार दिवंगत बाळु धानोरकर यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले होते. आता सार्वञिक निवडणुकीत सहानुभूती बघता दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्‍या अर्धांगीनी आ. प्रतिभा धानोरकर यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल असे वाटत असतांनाच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्‍या मुलीला लोकसभा निवडणुकीच्‍या रिंगणात उतरविण्‍याचे ठरवले असुन पक्षश्रेष्‍ठी जवळ जबर “फिल्‍डींग” लावल्‍याचे बोलल्‍या जात आहे.

कॉग्रेस पक्षातील अंतर्गत कलह बघता उमेदवारी जाहिर होई पर्यंत कोणताही निष्‍कर्ष काढणे कठीण आहे. तर भारतीय जनता पक्षाने माञ मागील निवडणुकीत पराभुत झालेल्‍या माजी केंद्रीय राज्‍यमंञी हंसराज अहिर यांचा पत्‍ता कट करुन राज्‍यातील वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्‍या रनसंग्रामात उतरवले आहे.

कॉग्रेस पक्षाला निवडणुका जिंकायच्‍या आहेत की आपल्‍या वारसदारांना प्रोजेक्‍ट करुन पुढील मैदान बळकावयाचे हेच कळत नाही. सध्‍यस्थितीत जातीय समिकरण निवडणुकांतील मुख्‍य अस्‍ञ झाले आहे. तर भाजपाने जातीय कार्ड बाजुला सारुन विकासाचे व्हिजन असलेल्‍या उमेदवाराला निवडणुक रिंगणात उतरवून अर्धी लढाई जिंकलेली आहे. कॉग्रेस पक्ष नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवतो हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे.
Rokhthok News