Home Breaking News समाज माध्‍यमांवर प्रतिभा धानोरकर यांची “हवा”

समाज माध्‍यमांवर प्रतिभा धानोरकर यांची “हवा”

● लक्षवेधी लढतीकडे संपुर्ण राज्‍याचे लक्ष

C1 20240329 18282603

लक्षवेधी लढतीकडे संपुर्ण राज्‍याचे लक्ष

सुनील पाटील-वणी | चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभेच्‍या सार्वञिक निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. दोन्‍ही राष्‍ट्रीय पक्षांने तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहे. दोन्‍ही बाजुने प्रचारयंञणा कार्यान्‍वीत करण्‍यात आली आहे. त्‍यातच समाज माध्‍यमातुन उमेदवारांचे समर्थक विविध पोस्‍ट व्‍हायरल करताहेत, त्‍यावर होणाऱ्या “कॉमेंट्स” बघता प्रतिभा धानोरकर यांची चांगलीच “हवा” असल्‍याचे दिसत आहे. Chandrapur-Wani-Arni Lok Sabha general election has started.

चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात महायुती व महाविकास आघाडीच्‍या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यानंतर कॉंग्रेस-भाजपामध्‍ये थेट लढत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तर प्रचारा दरम्‍यान परस्‍परविरोधी होणारी फटकेबाजी आणि झडत असलेल्‍या अरोप प्रत्‍यारोपांच्‍या फैरी यामुळे निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे.

C1 20240329 18482893
साभार

लोकसभा निवडणुकीच्‍या रणसंग्रामात उमेदवारांचे समर्थक समाज माध्‍यमांवर अनेकानेक पोस्‍ट व्‍हायरल करताहेत. त्‍यात उमेदवारांनी केलेला विकास, भविष्‍यात कार्यान्वित करण्‍यात येणाऱ्या योजनांचा समावेश आहे. अनेक विषयांवरील “मिम्‍स” आणि “पोस्‍ट” ट्रोल होतांना दिसत असुन काही वक्‍तव्‍यांवर खरपुस समाचार सुध्‍दा घेण्‍यात येत असल्‍याचे दिसत आहे.

Img 20250103 Wa0009

लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता बघता उमेदवारांच्‍या समर्थकांनी पोस्‍ट करतांना सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा. फेसबुक, whatsapp, ट्विटर तसेच अन्‍य माध्‍यमांवर निवडणुकीचा ज्‍वर ऊफाळून येत आहे. आपलाच उमेदवार कसा बलाढ्य आहे यावर चर्चा होताहेत तर बाजी कोण मारणार यावर सुध्‍दा मत मतांतर नोदविण्‍यात येताहेत. माञ चंद्रपुर आर्णी लोकसभेच्‍या निवडणुकीत कॉग्रेसच्‍या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची “हवा” असल्‍याचे समाज माध्‍यमातुन व्‍हायरल होणाऱ्या पोस्‍ट वरील कॉमेंट्स वरून दिसत आहे.
Rokhthok News