● मोहदा गावालगतच्या खदाणीत घडली घटना
Sad News : तालुक्यातील मोहदा या गावात वास्तव्यास असलेली 15 वर्षीय बालिका मैत्रिणीसह खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेली होती. तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली, मैत्रिणीने आरडाओरडा केला मात्र तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दिनांक 4 एप्रिल ला दुपारी घडली. Death of girl who went to wash clothes
विद्या अनील आडे (15) असे मृतक बालिकेचे नाव आहे. ती आपल्या परिवारासह मोहदा येथे वास्तव्यास होती. घटनेच्या दिवशी नेहमी प्रमाणे ती गावा लगत असलेल्या खदाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेली होती. सोबत तिची मैत्रीण सुद्धा होती, कपडे धूत असताना अचानक पाण्यामध्ये तीचा पाय घसरला
आणि खोल पाण्यात ती बुडायला लागली.
घडलेल्या प्रकारामुळे तिची मैत्रीण कमालीची घाबरली, तिने आरडाओरडा केला. काही नागरिक घटनास्थळी पोहचले. त्याचवेळ विद्याचे वडील सुध्दा तेथे पोहचले. काहींनी पाण्यात उड्या मारल्या परंतु तो पर्यंत विद्या चा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शिरपूर पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता हलविण्यात आला आहे. बालिकेच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News






