Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सभेची उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सभेची उत्सुकता

● नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांत उत्‍साह

716
C1 20240407 19360639
Img 20241016 Wa0023

नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांत उत्‍साह

सुनील पाटील- वणी | चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे. स्‍टार प्रचारकांच्‍या होणाऱ्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार दिनांक 8 एप्रीलला चंद्रपुरात येणार असल्‍याने नेते पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांत उत्‍साह संचारला आहे. Prime Minister of India Narendra Modi in Chandrapur for the campaign of Sudhir Mungantiwar

पहिल्‍या टप्‍प्‍यातील लोकसभेच्‍या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. प्रचार यंञणा राबवत असतांना राजकीय पक्ष काटेकोर नियोजन करतांना दिसत आहे. चंद्रपुर- वणी- आर्णी लोकसभेची निवडणुक दोन्‍ही राष्‍ट्रीय पक्षांनी अस्‍तीत्‍वाची केली आहे. सुरुवातीला आरोप प्रत्‍यारोपांच्‍या फैरी झाडण्‍यात आल्‍या तर आता विकास आणि मुद्यावर प्रचाराची दिशा ठरविण्‍यात येत आहे.

चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघात दोन्‍ही राजकीय पक्षांकडुन प्रचारार्थ स्‍टार प्रचारक आपली भुमीका वठवणार आहेत. पक्षांची ध्‍येय धोरणे मतदारांपर्यंत पोहचवणार आहेत. भाजपाच्‍या वतीने देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. तर नुकतीच केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांची पांढरकवडा येथे जाहिर सभा झालेली आहे. तसेच स्‍टार प्रचारकांसोबतच सिनेसृष्‍टीतील आघाडीचे सेलेब्रीटी “रोड शो” करणार असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

हजारो कार्यकर्ते स्‍वयंस्‍फूर्तीने सभेला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या जाहिर सभे करीता वणी विधानसभा क्षेञातुन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्‍वात वणी-झरी व मारेगांव येथील पाच हजाराच्‍यावर कार्यकर्ते स्‍वयंस्‍फूर्तीने चंद्रपुरला जाणार असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, भाजपाचे नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते सभेकरीता उपस्थित राहणार आहेत.
Rokhthok News

Previous articleत्याने…दुपट्ट्याने लावला गळफास
Next articleदणदणीत… प्रतिबंधित तंबाखूची तस्करी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.