Home Breaking News आणि तिचा….ढिगाऱ्याखाली आढळला मृतदेह

आणि तिचा….ढिगाऱ्याखाली आढळला मृतदेह

● बालिकेच्या मृत्‍यूने माजली खळबळ

1122
C1 20240512 17093484
Img 20240613 Wa0015

बालिकेच्या मृत्‍यूने माजली खळबळ

Sad News | शहरालगत असलेल्‍या एका ऑईल मिलच्‍या आवारातील सरकीच्‍या ढिगाऱ्याखाली दहा वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात कमालीची खळबळ माजली असुन श्‍वास गुदमरुन मृत्‍यू झाला असावा असा कयास वर्तविण्‍यात येत आहे. It is speculated that the death may have been due to suffocation.

ओमवती तानसिंग धुर्वे (10) असे मृतक बालीकेचे नांव आहे. स्वस्तिक ऑइल मिल कंपनीत मजुरांसाठी बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात कुटुंबासह वास्तव्यास होती. तिची आई मिल मध्‍ये कामाला होती तर वडील गवंडी काम करायचे.

तानसिंग धुर्वे हे परराज्‍यातील असुन रोजगारानिमित्‍य वणीत आले होते. ते पत्‍नी, तीन मुली व एक मुलगा असे स्वस्तिक ऑइल मिलच्‍या परिसरात मजुरांसाठी बांधण्‍यात आलेल्‍या निवाऱ्यात वास्‍तव्‍यास होते. घटनेच्‍या दिवशी ओमवती अचानक बेपत्‍ता झाली, तिची शोधाशोध करण्‍यात येत होती. शनिवार दिनांक 11 मे ला राञी दहा वाजताच्‍या दरम्‍यान सरकीच्‍या ढिगाऱ्याखाली दबलेल्‍या अवस्‍थेत तिचा मृतदेह आढळुन आला.

घटनेची माहिती पोलीसांना देण्‍यात आली, पोलीसांनी घटनास्‍थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेश उत्‍तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्‍णांलयात पाठविण्‍यात आला, ती बालीका सरकीच्‍या ढिगाऱ्याजवळ खेळत असतांना ढिगाऱ्यात दबली असावी असा कयास वर्तविण्‍यात येत असुन काही घातपात तर झाला नाही ना या दिशेने सुध्‍दा पोलीस तपास करताहेत.
Rokhthok News

C1 20240529 15445424