● वनविभाग सुस्त तर पालीका कुंभकर्णी झोपेत
Wani News | शहरात नव्यानेच कॉक्रीटचे रस्ते होताहेत, तर दुतर्फा नाल्या बांधण्यात आल्या आहेत. त्या सिमेंटच्या नाल्या अतिक्रमण धारकांसाठी पर्वणी ठरतांना दिसत असुन मिळेल त्या जागेवर अतिक्रमण धारकांनी बस्तान मांडले आहे. वन विभाग कार्यालयापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका झाडाची कत्तल करण्यात आली असुन वनविभाग सुस्त तर पालीका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. Slaughter of the tree in front of the encroached shop Forest Department is idle while Municipal Corporation is sleeping
वणी शहरात अतिक्रमण धारकांनी चांगलेच थैमान घातले आहे. दुकानदारी थाटण्याच्या नादात अनेक वेळा परस्परांना मारहाण सुध्दा झालेली बघावयास मिळत आहे. शहरातील संपुर्ण रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. पालीका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना लघु व्यवसायाकरीता खुली छूट दिली की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
वणी शहर प्रदुषणामुळे काळवंडलेले आहे, प्रदुषणावर मात व्हावी याकरीता पर्यावरण प्रेमी तथा वृक्षसंवर्धन समितीने ठिकठिकाणी झाडे लावलेली आहे. मात्र अतिक्रमीत दुकानाच्या अगदी समोर येणाऱ्या झाडामुळे अडथळा निर्माण होत असल्याने चक्क झाडाची कत्तलच करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी तहसील परिसरात घडला.
प्रशासनासाठी अतिक्रमण महत्वाचे आहे की, पर्यावरण रक्षणाकरीता लावण्यात आलेली झाडे असा सवाल संतप्त नागरीक उपस्थित करताहेत. वन विभागाने झाडाची कत्तल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरतांना दिसत आहे. तसेच शहरात सातत्याने होणारे अतिक्रमण कायमस्वरुपी काढण्याची गरज निर्माण झाली आहे. याकरीता पालिका प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावा असे अपेक्षीत आहे.
Rokhthok News।