Home Breaking News अपघातग्रस्त आदित्य ठणठणीत, उंबरकर ठरले देवदूत

अपघातग्रस्त आदित्य ठणठणीत, उंबरकर ठरले देवदूत

● उपचाराचा संपूर्ण खर्च मनसेने उचलला ● स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीत गुंग

1969
C1 20240526 18285709

उपचाराचा संपूर्ण खर्च मनसेने उचलला
स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीत गुंग

MNS NEWS | शहरातील रामपुरा येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या 19 वर्षीय तरुणांचा काही दिवसांपुर्वी अपघात झाला होता. दुखापत आणि जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या, तातडीने शस्‍ञक्रिया करणे जिकरीचे होते. परिस्थिती हालाखीची त्‍यातच मनसे नेते राजु उंबरकर देवदुतांसारखे अवतरले. उपचाराचा संपुर्ण खर्च उचलला. सध्‍यस्थितीत अदित्‍य ठणठणीत आहे. MNS leader Raju Umbarkar appeared like an angel.

तारुण्‍यांच्‍या उंबरठयावर पाय ठेवणारा अदित्‍य याचा अपघात झाला. गंभीर दुखापत झाल्‍याने डॉक्टरांनी शस्‍ञक्रिया करावी लागेल अशा सुचना दिल्‍यात. कायमस्वरूपी अपंगत्व आणि मेंदू निकामी होण्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्‍यामुळे घरची मंडळी हादरुन गेली. परिस्थिती अत्‍यंत हालाखीची काय करावं हे त्‍यांना सुचत नव्‍हतं.

अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणे तर कधी लोकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला वेठीस धरणे,  यासारख्या तत्परतेमुळे मनसे नेते राजु उंबरकर कायमच चर्चेत असतात. त्‍यांना अदित्‍य बाबत कळताच त्‍यांनी तातडीने त्‍यांच्‍या घरी धडक दिली. त्‍याच्‍या उपचाराचा संपुर्ण खर्च करण्‍याची हमी देत नागपुर येथील प्रसिध्‍द रुग्‍णांलयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली असुन संपूर्ण उपचार करण्यात आले. आदित्यला देण्यात आलेल्या उपचारा नंतर आता तो ठणठणीत बरा झाला आहे.

बहुतांश लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंग असताना राजु उंबरकर मात्र जनसेवेत गुंतले होते. त्‍यांच्‍या धडाडीने एक तरुण अपंगत्‍वापासुन बरा झाला आहे. सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून गोरगरिबांना मदत करणे तसेच किंवा कोणतीही प्रशासकीय,  राजकीय, सामाजिक प्रश्न सोडवल्यामुळे माझे मानवी जीवन सार्थकी लागले असुन अडल्‍या नडलेल्‍यांसाठी सदैव कटिबद्ध असल्‍याचे मत मनसे नेते राजु उंबरकरांनी व्‍यक्‍त केले आहे. 
Rokhthok News