Home Breaking News “संजय”.. विधानसभेतील तुल्यबळ उमेदवार… !

“संजय”.. विधानसभेतील तुल्यबळ उमेदवार… !

● महाविकास आघाडीचा TOP फॉर्म्युला

C1 20240528 07452733

महाविकास आघाडीचा TOP फॉर्म्युला

Political News : सुनील पाटील
वणी विधानसभेच्या पुढील निवडणुकीत अनेक लक्षवेधी घडामोडी घडणार असल्याचे संकेत सध्यस्थीतीत मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार का? हे बघणे औत्सुक्याचे असले तरी शेवटच्या क्षणी नेमकं काय घडणार हे त्यावेळची परिस्थिती ठरवणार आहे. मात्र “संजय”… विधानसभेतील तुल्यबळ उमेदवार असणार आहे. “Sanjay”… is going to be a candidate in the Legislative Assembly.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत तुल्यबळ लढती झाल्या. यात बाजी कोण मारणार हे 4 जूनला स्पष्ट होईल. परंतु या निवडणुकीत महायुती पेक्षा महाविकास आघाडीचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. आघाडीतील सहयोगी राजकीय पक्षाच्या वतीने इमानेइतबारे निवडणूक लढविल्यामुळे बहुतांश मतदारसंघात विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

वणी विधानसभेत मागील दहा वर्षांपासून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे प्रतिनिधित्व करताहेत. त्यांच्या बाबत मतदारसंघात नकारात्मकता नाही. विकासकामाच्या बाबतीत ते अव्वल आहेत, शेकडो कोटींचा निधी त्यांनी खेचून आणला आहे. मात्र सरकारच्या धेयधोरणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आलेला आहे किंबहूना येणार आहे.

Img 20250103 Wa0009

विधानसभेच्या निवडणुकीकरिता महाविकास आघाडी कामाला लागली आहे. ऐनवेळी उमेदवारी कोणाच्या वाटेला जाणार हे गुलदस्त्यात असले तरी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) चे संभाव्य उमेदवार पूर्वतयारी करताहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्ष्याच्या नेत्यांनी झपाटल्यागत उमेदवारांचा प्रचार केला आहे.

काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी याकरिता सहकार क्षेत्रात अल्पावधीतच दबदबा निर्माण करणारे संजय खाडे इच्छुक आहेत. ते काँग्रेस पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहेत, त्यांनी  मतदारसंघात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. तथापी जातीय समिकरणाचा विचार केल्यास ते तुल्यबळ उमेदवार ठरतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला गेला तर प्रामुख्याने दोन नावे अग्रस्थानी असणार आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे व लोकनेते संजय देरकर, या दोघांचाही आपापल्या क्षेत्रात प्रचंड जनाधार आहे. मतदारसंघात देरकर यांचा प्रभाव असल्याचे आजपर्यंतच्या निवडणुकातून सिद्ध झाले आहे. तर एकनिष्ठ शिवसैनिक तसेच “मास लीडर” म्हणून संजय निखाडे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

महायुतीचे मतदारसंघनिहाय जागावाटप कसे होणार याचा अद्याप थांगपत्ता नाही. परंतु दोन टर्म आमदार असलेल्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांना डावलने शक्य नाही तरी सुद्धा मनसे सोबत युती झाल्यास विदर्भातून एकमेव राजू उंबरकर दावेदार असेल. यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी तीन पैकी एका “संजय” ला निवडणूक रिंगणात उतरवेल असे सकृतदर्शनी दिसत आहे आणि तो उमेदवार तुल्यबळ असेल हे नाकारता येत नाही.
Rokhthok News