Home Breaking News Exit polls | देशमुख, धानोरकर, आष्टीकर यांना कौल

Exit polls | देशमुख, धानोरकर, आष्टीकर यांना कौल

● सुधीर मुनगंटीवार यांना जबर धक्का ● यवतमाळ जिल्ह्यात मविआचा "डंका"

1470
C1 20240602 07291462

सुधीर मुनगंटीवार यांना जबर धक्का
यवतमाळ जिल्ह्यात मविआचा “डंका”

सुनील पाटील-वणी | एक्झिट पोल नुसार यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीला मतदारांचा कौल असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर -आर्णी लोकसभेत सुधीर मुनगंटीवार यांना जबर धक्का देत प्रतिभा धानोरकर यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे तर शिवसेना UBT गटाचे संजय देशमुख व नागेश पाटील आष्टीकर प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांवर मात करत आघाडी घेताना दिसत असून यवतमाळ जिल्ह्यात मविआचा “डंका” वाजत आहे. According to the exit poll, it is seen that Mahavikas Aghadi has the support of voters in Yavatmal district.

Img 20250422 wa0027

यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघात विभागले आहे. यवतमाळ- वाशीम मध्ये पुसद, दारव्हा-दिग्रस, यवतमाळ व राळेगाव विधानसभेचा समावेश आहे. त्याप्रमाणेच चंद्रपूर-वणी- आर्णी मध्ये केळापूर-आर्णी व वणी विधानसभा तर उमरखेड विधानसभा हिंगोली लोकसभेत समाविष्ट आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्याला तीन खासदार लाभले आहे.

Img 20250103 Wa0009

यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे प्राबल्य असताना लोकसभेत महाविकास आघाडीची होणारी आगेकूच अचंबित करणारी आहे. सातही विधानसभेत महायुतीचे आमदार आहेत. यात पाच आमदार भाजपचे आहेत, तर एक शिवसेना शिंदे व पुसदचे आमदार राष्ट्रवादी AP गटाचे आहेत. तिन्ही लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढती होतील असा अंदाज असताना एक्झिट पोल नुसार निवडणुका एकतर्फी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभेत मागील पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. भावना गवळी सलग पाचवेळा निवडून आल्या आहेत. त्यांचेवर ईडीची वक्रदृष्टी पडली आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. त्याप्रमाणेच हिंगोलीचे मावळते खासदार हेमंत पाटील यांना डच्चू देत त्यांच्या सौभाग्यवती राजश्री महल्ले पाटील यांना माहेरी पाठवून उमेदवारी देण्यात आली.

शिवसेना दुभंगल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तडफदार एकनिष्ठ शिवसैनिकांना बळ दिले. संजय देशमुख यांचेवर यवतमाळ-वाशीम तर नागेश पाटील आष्टीकर यांचेवर हिंगोली लोकसभेची जबाबदारी सोपवली. झंझावाती प्रचार यंत्रणा राबवत देशमुख व आष्टीकर यांनी आघाडी घेतली आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेत भाजपने तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला. तर काँग्रेस पक्षाने आ. प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. सहानुभूती, जातीय समीकरण व मतदारांनी हाती घेतलेली निवडणूक धानोरकर यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. तर मुनगंटीवार यांचे वादग्रस्त वक्तव्य अडचणीत आणणारे ठरल्याचे दिसत असून चार जूनला गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होणार आहे.
Rokhthok News