● मतविभाजन झाल्यास महायुतीला फायदा
सुनील पाटील वणी | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीची दाणादण उडवली आहे. बहुतांश लोकसभा मतदारसंघात बलाढ्य उमेदवारांना चित करत बाजी मारली आहे. या लोकसभा निवडणुकीत वणी विधानसभेत कॉग्रेस उमेदवाराला 61.44 टक्के तर भाजपाला 33.77 टक्के मते मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुकींत महायुतीला धोका कायम असुन महाविकास आघाडीचे पारडे जड आहे. Congress candidate has got 61.44 percent votes while BJP got 33.77 percent votes in Wani Assembly.
विधानसभेच्या 2019 मघ्ये झालेल्या सार्वञिक निवडणुकीत भाजपा उमेदवार संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार यांना (67,710) 32.38 टक्के मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी उमेदवार कॉग्रेसचे वामनराव बापुराव कासावार (39,915) 19.09 टक्के मते मिळाली. या निवडणुकीत (27,795) मताधिक्याने बोदकुरवार यांचा विजय झाला होता. माञ या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती असतांना शिवसेनेच्या दोन नेत्यांनी बंडखोरी करत तब्बल (23,898) 10 टक्के मतें खेचली होती तर 10 टक्के मतें शिवसैनिकांनी युतीधर्म पाळत भाजपाच्या पारड्यात टाकली होती.
विधानसभेच्या 2014 पुर्वी झालेल्या निवडणुकांत भाजपाच्या मतांची टक्केवारी नेमकी किती हे कळायला मार्ग नव्हता, कारण सातत्याने शिवसेना भाजपाची युती असायची. 2014 मध्ये युती दुभंगली व दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले. यावेळी मोदी लाटेचा प्रभाव असल्याने भाजपाला 23.03 टक्के तर शिवसेनेला 20.17 टक्के मते मिळाली होती. वणी विधानसभेत शिवसेनेची 20 ते 23 टक्के मते पुर्वापार कायम आहे. त्या प्रमाणेच कॉग्रेसला 2014 मध्ये 19.86 तर 2019 ला 19.09 टक्के मतें मिळाली होती.