● एक लाख रुपयांचा गांजा जप्त
Crime News | स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पांढरकवडा पोलीसांसह LCB पथकाने रुझां गावाजवळ सापळा रचला. यावेळी तेलंगणा राज्यातील आरोपीला ताब्यात घेत त्याचे जवळुन आठ किलो 870 ग्राम गांजा जप्त करुन मुददेमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई रविवार दिनांक 9 जुन ला करण्यात आली. 8 kg 870 grams ganja seized from accused in Telangana state
अलीम खान सलीम खान (29) रा. अबुबकर मस्जीद जवळ, शांतीनगर अदिलाबाद, तेलंगना या गांजा तस्कराला ताब्यात घेण्यात आले. घटनेच्या दिवशी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा हद्दीत फरार आरोपींचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीदाराने टिप दिली की, तेलंगणातुन गांजा तस्कर परिसरात गांजा वितरीत करणार आहे. बातमीची खातरजमा करत एलसीबी पथकाने पांढरकवडा पोलीसांना सोबत घेत घटनास्थळी सापळा रचला.
रुझां गावाच्या लगत पेट्रोल पंपाजवळ सशंयीत दिसून आला. त्याचे जवळ प्लास्टीकचे चुंगडे होते, त्याची झाडाझडती घेतली असता त्यात एक लाख पाच हजार 754 रुपयांचा 8 किला 870 ग्राम गांजा आढळुन आला. मुददेमाल जप्त करुन त्याचे विरोधात पोलीस ठाणे पांढरकवडा येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, PI LCB आधारसिंग सोनोने, PI पांढरकवडा दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात API विवेक देशमुख, PSI पांढरकवडा देवेंद्र मेशकर, विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, उल्हास कुरकुटे, धनंजय श्रीरामे LCB. यवतमाळ व मारोती पाटिल, सचीन काकडे, राजु बेलेवार पांढरकवडा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ROKHTHOK NEWS