Home Breaking News तस्करांचा नवा फंडा, शेतकरी भासवून गोवंश तस्करी

तस्करांचा नवा फंडा, शेतकरी भासवून गोवंश तस्करी

● चार वाहने ताब्यात, 12 गोवंशाची सुटका ● 23 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त

940
C1 20240624 15111635

चार वाहने ताब्यात, 12 गोवंशाची सुटका
23 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली असता दिनांक 23 जूनला सायंकाळी 5 वाजता कायर मार्गावर पेटूर जवळ नाकाबंदी केली. यावेळी चार वाहनात निर्दयपणे कोंबून असलेल्या 12 गोवंशाची सुटका करण्यात आली तर 23 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. New funda of smugglers, cattle smuggling by pretending to be farmers

Img 20250422 wa0027

गोवंश तस्करांनी आता नवीन फंडा अवलंबला आहे. शेतकऱ्यांची गुरेढोरे असल्याचे भासवून गोवंश तस्करी करण्यात येत असल्याचा नवीन फंडा स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला आहे. वरोरा, वणी, मुकुटबन मार्गे अदिलाबाद कडे गोवंशाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पेटूर गावाजवळ सापळा रचला आणि एकामागे एक येणाऱ्या चार बोलेरो वाहनाला ताब्यात घेतले.

Img 20250103 Wa0009

अक्षय अनिल करलुके (28) रा. पुरड नेरड, नितेश रविन्द्र किनाके (22) रा. वंदली ता. वरोरा जि. चंन्द्रपुर, निलेश बंडुजी कोल्हे (28) रा. लोणारा ता. संमुद्रपुर जि. वर्धा, सैय्यद शाकीर सैय्यद महेमुद (32) चिखलवर्धा ता. घाटंजी जि. यवतमाळ हे चालक असलेले बोलेरो पिक वाहन क्रमांक MH-29- BE- 6324, MH- 32- AJ- 0237, MH- 07- P- 3668, एक बोलेरो पिकअप बिना नंबर ही वाहने ताब्यात घेण्यात आली.

वाहन चालकाला ताब्यात घेत विचारणा केली असता सदरची जनावरे सैय्यद खय्याम सैयद गफार रा. मुकुटबन ता. झरी यांचे सांगणेवरुन वाहतुक करीत असल्याचे सांगितले. तसेच गोवंश तस्करीच्या चारही वाहनात आर्थिक विवंचनेत असलेल्या गरीब शेतकऱ्यांना रोजी देऊन आपलीच जनावरे असल्याचा बनाव करण्यात आला होता मात्र पोलिसांनी तस्करांचा डाव उधळला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, LCB PI आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली API अमोल मुडे, PSI रामेश्वर कांडुरे, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतीश फुके LCB पथक यांनी केली.
ROKHTHOK NEWS