Home Breaking News शेतकरी, सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांचा स्तुत्य उपक्रम

शेतकरी, सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांचा स्तुत्य उपक्रम

● वणीत चालतं-फिरतं जनहित कार्यालय

164
C1 20240705 13421667

वणीत चालतं-फिरतं जनहित कार्यालय

Wani News | शासकीय योजनेची माहिती शेतकरी व सर्वसामान्‍य नागरीकांना नसते यामुळे त्‍यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. गरीब पाञ लाभार्थ्‍यांना थेट माहिती प्राप्‍त व्‍हावी याकरीता कॉग्रेसचे जिल्‍हा सरचिटणिस संजय खाडे यांनी चालतं-फिरतं जनहित कार्यालय हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 4 जुलैला खाती चौक येथील कार्यालयात या केंद्राचे थाटात उद्घाटन करण्‍यात आले. District General Secretary of Congress Sanjay Khade has started an innovative initiative of walking-moving public interest office.

C1 20240705 13504621

संजय खाडे यांच्‍या संकल्‍पनेतुन व खा. प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनातून हा स्‍तुत्‍य उपक्रम राबविण्‍यात येत आहे. विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी, विद्यार्थी,  महिला, दिव्यांग, निराधार यांची होणारी धावपळ, योजनेचा लाभ घेण्यासंबंधी असलेली अपुरी माहिती. तांत्रिक अडचणी यामुळे अनेक लाभार्थी हे वंचित राहतात, ही समस्या लक्षात घेऊन हे जनहित केंद्र सुरु करण्यात आले आहे.

दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून खातीचौक येथील कार्यालयात चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन करण्‍यात आले. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अध्‍यक्षस्‍थानी ऍड. देविदास काळे होते. जनहित केंद्राचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे ते लाभा पासून वंचित राहणार नाही, असे मनोगत काळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. यावेळी जयसिंग गोहोकार,  घनश्याम पावडे, संध्या बोबडे, काजल शेख इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.

काय आहे चालतं-फिरतं जनहित केंद्र?

शासनाच्या विविध योजनेचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी कोणती कागदपत्र जोडावी, ऑनलाईन अप्लाय कसे करावे? याची पद्धत व तांत्रिक माहिती अनेक लाभार्थ्याला नसते. अशा लाभार्थ्यांना हेल्पलाईनवर (9637375455)  संपर्क साधावा लागणार आहे. संपर्क करताच जनहित केंद्राची टीम त्या गावात किंवा लाभार्थी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचणार व लाभार्थ्यांला मदत करणार. याशिवाय खाती चौक येथील कार्यालयात देखील लाभार्थ्यांना मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे.

आयोजीत कार्यक्रमाला सुरेश काकडे, प्रा. शंकर व-हाटे, राजेंद्र कोरडे, पुरुषोत्तम आवारी, अल्का महाकुलकर, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, अनिल देरकर, तेजराज बोढे, अशोक नागभिडकर, अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, मंदा बांगरे, संगिता खाडे, निलीमा काळे, प्रमिला चौधरी, किरण कुत्तरमारे, संगिता मांढरे, डेव्हिड पेरकावार, डॅनी सँड्रावार, महादेव तडेवार, अनंतलाल चौधरी, विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, विलास चिकटे, संजय सपाट, सुरेश बनसोड, प्रदीप खेकारे, अशोक पांडे, विठ्ठल पिंपळे, प्रेमनाथ मंगाम, नागोराव आवारी, कुणाल पिंपळे, प्रवीण बदमवार,  देवराव देउळकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रमोद वासेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते,  पदाधिकारी, मदत झालेले लाभार्थी, मदतीसाठी आलेले लाभार्थी यांच्यासह सर्वसामान्यांची उपस्थिती होती.
Rokhthok News