● भारतीय जनता पार्टीकडून निषेध
Wani News | संसदेच्या सर्वाच्च सभागृहात कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु धर्माबाबत अनुचित वक्तव्य केले. यामुळे हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत याचे पडसाद वणीत उमटले आहे. जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील छञपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करत त्या घटनेचा तिव्र निषेध केला. There is an impression that the sentiments of Hindus have been hurt.
देशाच्या सर्वोच्च सभागृहात जिथे कायदा बनतो आणि संपूर्ण भारतातील नागरीक सभागृहातील भाषणे ऐकतात तिथे कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी बोलताना जे लोक स्वतःला हिंदु म्हणतात ते 24 तास फक्त हिंसा करतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. राहुल गांधी यांनी त्यांचे वक्तव्य परत घ्यावे व समस्त हिंदु धर्माची माफी मागावी असे निवेदन याप्रसंगी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी तारेंद्र बोर्डे, बंडु चांदेकर, विजय पिदुरकर, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, अशोक सुर, नितीन वासेकर, निलेश होले, निखील खाडे, लवलेश लाल, सत्यजीत ठाकुरवार, राजेंद्र साखरकर यांचेसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News