Home Breaking News विधानसभेत हे चेहरे असतील “गेम चेंजर”

विधानसभेत हे चेहरे असतील “गेम चेंजर”

● तरुण तडफदार उमेदवाराला मिळणार संधी

1281
C1 20240708 22281320

तरुण तडफदार उमेदवाराला मिळणार संधी

Political News: सुनील पाटील | वणी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपापल्या राजकिय पक्षाकडून पुन्हा तेच ते चेहरे उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करताहेत. पक्षश्रेष्ठींनी नव्या दमाच्या तरुण तडफदार उमेदवारांना संधी देण्याची गरज निर्माण झाली असून वणी विधानसभेत हे चेहरे “गेम चेंजर” असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. These faces will be a “game changer” in the Wani assembly

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी त्याच- त्या चेहऱ्याची वाट लावली आहे. स्वतःला भारदस्त समजणाऱ्याना मतदारांनी घरी बसवले, हे वास्तव विसरता येणार नाही. वणी विधानसभेत मागील दोन टर्म भाजपची सत्ता आहे. विद्यमान आमदारांलाच संधी मिळेल असे दिसत आहे. तर विरोधातील मविआचा उमेदवार कोण ? हे अद्याप निश्चित नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे नेते राजू उंबरकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे किंवा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यापैकी दोघे “गेम चेंजर” ठरतील असे भाकीत वर्तविण्यात येत आहे. मविआ च्या जागा वाटपात वणी विधानसभेची सीट काँग्रेसला गेली तर प्रबळ दावेदार संजय खाडे असतील आणि शिवसेना उबाठा ला सुटली तर शेवटच्या क्षणी उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे या एकनिष्ठ शिवसैनिकाला संधी मिळेल असे चित्र आहे. तिरंगी लढतीत राजू उंबरकर, खाडे किंवा निखाडे व भाजपचे उमेदवार अशी लढत अपेक्षित आहे.

पक्षनिहाय संभाव्य उमेदवार

मनसे-

Img 20240417 165415

तिरंगी लढत झाल्यास फक्त मनसेचा उमेदवार फिक्स आहे, मनसे नेते राजू उंबरकर निवडणूक लढणारच आहे. सदोदित सर्वसमावेशक जनहितार्थ आंदोलने, विविध समाजपयोगी उपक्रम यामुळे त्यांची मतदारसंघात चांगलीच “क्रेझ” आहे. कार्यकर्त्यांची उत्तम फळी तथा संघटनात्मक बांधणी तर आहेच शिवाय शेवटच्या घटकापर्यंत असणारा संपर्क त्यांना फायदेशीर ठरणार आहे.

भाजपा

Img 20240622 091051
सलग दोन पंचवार्षिक आमदारकी उपभोगणारे भाजपचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या बाबत नकारात्मकता नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य व जातीयसमीकरण यामुळे पक्षश्रेष्ठी नवा चेहरा पुढे करणार का हे बघणे औत्सुक्याचे आहे.

शिवसेना उबाठा –

Img 20240622 091835
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यास उमेदवार कोण असा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकणार आहे. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे व संजय देरकर अशा तिघांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता सुनील कातकडे हे सुध्दा उमेदवारी मिळविण्यासाठी धडपडताहेत.

काँग्रेस

Img 20240512 095829
मतदारसंघ मिळावा याकरिता काँग्रेस पक्ष प्रयत्नरत आहे. खा. प्रतिभा धानोरकर व माजी आ. वामनराव कासावार यांना विश्वासात घेऊनच पक्षश्रेष्ठी उमेदवारी बाबत निर्णय घेणार आहे. मात्र सध्यस्थीतीत संजय खाडे हे प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. त्या सोबतच वामनराव कासावार, राजीव कासावार, अरुणा खंडाळकर, ऍड. देविदास काळे, टीकाराम कोंगरे यांच्या नावाची चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.
ROKHTHOK NEWS