Home Breaking News वणी मतदारसंघावर दावा,  पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्‍यक्षांना साकडे

वणी मतदारसंघावर दावा,  पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्‍यक्षांना साकडे

● खा. धानोरकर व कासावार यांनी घेतली नाना पटोले यांची भेट

C1 20240710 14561285

खा. धानोरकर व कासावार यांनी घेतली नाना पटोले यांची भेट

Political news : सुनील पाटील | शिवसेना उबाठा पक्ष वणी विधानसभा निवडणूक लढणार अशा चर्चा रंगायला लागल्‍याने कॉग्रेस पक्षात संतापाची लाट पसरली आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांचे नेतृत्‍वात विधानसभेतील कॉग्रेस कमिटीच्‍या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांना साकडे घातले असुन वणी मतदारसंघावर दावा केला आहे. याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर सुध्‍दा प्रामुख्‍याने उपस्थित होत्‍या. Claiming Wani Constituency, Congress request to state presidents

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. अवघ्‍या काही महिन्‍यांवर निवडणुका येवून ठेपल्‍या आहेत. बहुतांश राजकीय पक्ष उमेदवारांबाबत चाचपणी करताहेत. तर महाविकास आघाडीच्‍या जागा वाटपात वणी विधानसभा कोणाच्‍या वाटयाला जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना उबाठा पक्षाला जागा सुटल्‍याच्‍या वावडया उडत असल्‍याने कॉग्रेस पक्षातील संभाव्‍य उमेदवार सैरभैर झाल्‍याचे दिसत आहे. तर कार्यकर्त्‍यांत नाराजीचा सुर उमटायला लागला आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांचेसह माजी आमदार वामनराव कासावार व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांची मुंबई येथे दिनांक 8 जुलैला भेट घेतली व विस्तृत चर्चा केली. याप्रसंगी कॉग्रेस कमिटी वणी तालुकाध्‍यक्ष घनशाम पावडे, मारेगांव तालुकाध्‍यक्ष मारोती गौरकार, झरी तालुकाध्‍यक्ष आशिष खुळसंगे  व वणी शहराध्‍यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांचे स्‍वाक्षरीचे निवेदन सादर केले.

Img 20250103 Wa0009

का हवाय वणी मतदारसंघ

लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी अहोराञ परिश्रम घेतले. वणी विधानसभेतुन 58 हजाराचे मताधिक्‍य मिळवून देत प्रतिभा धानोरकर यांना खासदार म्‍हणुन विजयी करण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली असे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे. तर महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या निर्मीतीपासुन आतापर्यंत नऊ वेळा कॉग्रेस पक्षाचे आमदार झाले आहेत. मोदी लाटेत सुध्‍दा कॉग्रेस पक्षाचा उमेदवार दुसऱ्यास्थानी राहील्‍याचे स्‍पष्‍ट करत वणी विधानसभेत माजी आमदार वामनराव कासावार यांचे नेतृत्‍वात कॉग्रेस पक्ष एकजुटीने वाटचाल करीत असल्‍याचे नमुद करण्‍यात आले आहे.

शिवसेना उबाठा पक्ष गटातटात विखुरला

महाविकास आघाडीचे सहयोगी पक्ष शिवसेना उबाठा पक्षाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. परंतु तोच पक्ष गटातटात विखुरला असल्‍याचे निवेदनातुन स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. त्‍यातच केवळ एकवेळा 2004 मध्‍ये शिवसेना भाजपा युतीचा उमेदवार निवडून आल्‍याचे स्‍पष्‍ट करत त्‍यांच्‍या पेक्षा कॉग्रेस पक्षाची ताकद मतदारसंघात अधिक असल्‍याने स्वयंम पुढाकार घेवुन वणी विधानसभा कॉग्रेसला कायम ठेवावा अशी मागणी करण्‍यात आली आहे.
ROKHTHOK NEWS

Previous articleविधानसभेत हे चेहरे असतील “गेम चेंजर”
Next articleयुवकाची विष प्राशन करून आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.