● शेतात जात असताना घडली दुर्दैवी घटना
Sad News | सर्वत्र दणदणीत पाऊस पडतो आहे, नदी-नाले दुथडी भरून वाहताहेत. मारेगाव तालुक्यातील दापोरा शिवारातील उपाशा नाल्याला पूर आला होता. त्यातच चिंचमंडळ येथील शेतकरी आपल्या पशुधनासह पांदण रस्त्याने शेतात जात असताना पाण्याचा जोरदार प्रवाहाने वाहून गेला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडली. While the farmer was going to the field along the Pandan road, he was swept away by a strong stream of water.
मेघश्याम नारायण वासाडे (55) असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे. ते चिंचमंडळ येथील निवासी होते. घटनेच्या दिवशी ते आपल्या पशुधनासोबत शेतात जात होते. दापोरा फाट्या समोरील उपाश्या पुलाच्या बाजूने शिवपांदन रस्त्याने पाणी ओलांडून पशुधन घेवून शेतात जात असतांना पाण्याचा जोरदार प्रवाह आला आणि यात ते वाहून गेले.
ही बाब ग्रामस्थांना कळताच तेथे बघ्याची मोठी गर्दी झाली होती. पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी काही तरुण सरसावले तर पोलीस तसेच महसूल प्रशासनाला कळविण्यात आले. काही अंतरावर मृतक शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे. या धक्कादायक घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News






