● प्रा. टिकाराम कोंगरे यांचा पुढाकार
Wani News | दिवसेंदिवस महिलां मध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेची बाब झाली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने गुरुदेव नागरी सह. पतसंस्था व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्युट नागपुर यांचे सहकार्याने दि. 13 ऑगस्टला निःशुल्क – स्तन कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. Free – Breast cancer screening camp is organized.
कर्करोग हा जीव घेणा आजार झाला आहे, हल्लीच्या राहणीमान, व विषयुक्त फळ भाज्यानी कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. यातही महिला या आजाराने जास्त बळी पडतात, घरकामात व्यस्त असलेल्या महिला स्वतःच्या आरोग्या कडे दुर्लक्ष करतात तसेच या आजाराच्या तपासण्या महागड्या असल्याने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाही त्यामुळे याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
महिलांमध्ये गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे महिलांना कर्करोगा पूर्वी तपासणी करता यावी याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. टिकाराम कोंगरे यांनी दिली आहे. येथील शेतकरी मंदिरात दि 13 ऑगस्ट ला सकाळी 11 ते 5 या वेळेत नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्युट नागपुर येथील तज्ञ डॉक्टरां कडून तपासणी केली जाणार आहे.
जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान संध्या बोबडे अध्यक्ष यवतमाळ जि.म.कॉ. कमेटी, सुरेखा लोडे अध्यक्ष वणी ता. म.कॉ. कमेटी, शामा तोटावार अध्यक्ष वणी शहर म. कॉ. कमेटी, माया गाडगे अध्यक्ष मारेगांव ता. म.कॉ. कमेटी, देवकाबाई येनगंटीवार अध्यक्ष झरी ता. म.कॉ. कमेटी यांनी केले आहे.
Rokhthok News






