Home Breaking News जनता दरबारात खा. धानोरकर गरजल्या

जनता दरबारात खा. धानोरकर गरजल्या

● अधिकाऱ्यांना तंबी, नागरिकांची कामे त्वरित करा

C1 20240812 19002569
अधिकाऱ्यांना तंबी, नागरिकांची कामे त्वरित करा

Political News | चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सोमवारी वणीत जनता दरबार घेतला. या माध्यमातून जनतेशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, अधिकाऱ्यांनी देखील सामान्य नागरिकांची कामे त्वरित करावी, हयगय खपवून घेणार नाही असा दम दिला. Chandrapur-Wani-Arni Lok Sabha MP Pratibha Dhanorkar held “Janata Durbar” in Wani on Monday.

लोकसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी खासदार झाली, घसघशीत मताधिक्याने निवडून दिले. जनतेची सेवा करणे हेच माझे प्रथम कर्तव्य असल्याचे खा. धानोरकर यांनी स्पष्ट केले. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात वेळोवेळी जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य, वीज, रस्ते व व महसुली कामे तात्काळ व्हावी या करीता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे सांगितले. तसेच अधिकाऱ्यांनी देखील सामान्य नागरिकांची कामे त्वरित करावी कोणतीही हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदने खा. धानोरकर यांना दिले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009
Previous articleयुवकांना मनसेच्या विचारधारेचे आकर्षण
Next articleSuicide : विषाचा घोट, ईसमाची आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.