Home Breaking News “जेठालाल”…..मनसे गरबा महोत्सवात वाढवणार रंगत

“जेठालाल”…..मनसे गरबा महोत्सवात वाढवणार रंगत

● निवडणुकांच्या धामधुमीत सिने सेलिब्रिटींची हजेरी

C1 20241001 17543708
निवडणुकांच्या धामधुमीत सिने सेलिब्रिटींची हजेरी

NEWS WANI : नवराञोत्‍सवात गरबा  दांडीयाच्‍या माध्‍यमातुन तरुण तरुणींचा उत्‍साह व्दिगुणित व्‍हावा याकरीता मागील तीन वर्षापासुन मनसे नेते राजु उंबरकर मनसे गरबा महोत्सवाचे आयोजन करतात. सिने सेलिब्रिटींची वर्दळ प्रमुख आकर्षण असते. यावर्षी हास्य मालिका “तारक मेहता का उलटा चस्मा” फेम “जेठालाल” दिलीप जोशी हे मनसे गरबा महोत्सवात धमाल उडवणार आहे. MNS leader Raju Umbarkar organizes the MNS Garba festival.

“मनसे गरबा महोत्सवास” शहरातील तरुण तरुणी व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. प्रेक्षकांचा सुद्धा तुफान प्रतिसाद मिळतो, लयबध्द संगिताच्‍या तालावर तरुण तरुणी बेधुदपणे गरबा नृत्‍यांत सहभागी होतात. पारंपरिक वेशभूषेत तरुण- तरुणी राम शेवाळकर परिसरातील मनसे गरबा महोत्‍सवात हजेरी लावतात.

नवराञोत्‍सवात दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या कडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागील तीन वर्षांपासून मनसे द्वारा आयोजित रास दांडिया मध्ये गर्दीने उच्चांक गाठला आहे. निवडणुकांच्या धामधुमीत गरबा महोत्‍सवाची धमाल अनुभवण्यास तरुणाई सज्ज झाली आहे.

Img 20250103 Wa0009

सराव प्रशिक्षण शिबिर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नृत्य कौशल्यांना वाव देण्यासाठी आणि येणाऱ्या गरबा उत्सवाची तयारी करण्यासाठी सराव प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. वरोरा मार्गावरील महावीर भवन येथे सायंकाळी 5 ते 6 वाजता पर्यंत नृत्य कौशल्य आणि सराव शिबिर घेण्यात आले आहे तरी उत्साही तरुण तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Rokhthok News