● परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर
Sad News | येथील विनायक नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या व चंद्रपुर मध्ये वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन इंटर्नशिप करत असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेने कमालीची खळबळ माजली असुन परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. The death of a 23-year-old girl who was doing an internship after completing her medical education.
आचल प्रमोद गोरे (23) असे मृतक डॉक्टर तरुणीचे नांव आहे. तिने वैद्यकीय क्षेञातील BAMS मध्ये शिक्षण पुर्ण केले होते आणि ती इंटर्नशिप करत होती. गुरुवारी सकाळी तीला झोपेतुन उठवण्याकरीता तिच्या वस्तीगृहातील मैञीणी गेल्या असता ती शुध्द हरपलेली होती. मैञीणींनी तीला तात्काळ रुग्णांलयात उपचारार्थ हलवले माञ तो पर्यंत तिची प्राणज्योत मालवली.
विनायक नगर येथे वास्तव्यास असलेले गोरे कुटूंबीय उच्च शिक्षीत आहेत. आचलचे वडील वेकोलीत कामाला असुन ते मुळचे बोर्डा येथील असुन सध्या वणीत वास्तव्यास आहे. आचल ही हुशार आणि होतकरु तरुणी होती. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्याने झाला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी तिचा मृत्यू नेमका कशाने झाला हे पोलीस तपासातुन निष्पन्न होणार आहे. माञ तिच्या अकस्मात मृत्यूने परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )