Home Breaking News राजे गरबा उत्‍सवात सेलीब्रिटींची धुम

राजे गरबा उत्‍सवात सेलीब्रिटींची धुम

● आज भारत गणेशपुरे वणीत

C1 20241004 17512654

आज भारत गणेशपुरे वणीत

Wani News | वसंत जिनिंग शेतकरी मंदिराच्‍या लॉन मध्‍ये भव्‍य स्‍वरुपात दांडिया उत्‍सव साजरा करण्‍यात येत आहे. वसंत जिनिंगचे अध्‍यक्ष आशिष खुळसंगे व जनहित कल्याण संघटनेचे गौरीशंकर खुराणा यांच्‍या संकल्‍पनेतुन राजे गरबा उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्‍सवात सेलिब्रिटींची धुम असणार आहे. The nine-day long festival is going to be full of celebrities.

नवनवीन सेलिब्रिटी राजे गरबा महोत्सवाला भेट देणार आहे. यामध्ये दिनांक 4 ऑक्टोबरला “चला हवा येऊ द्या” फेम मराठी कलाकार भारत गणेशपुरे यांचे विशेष आकर्षण असणार आहे. तर 9 ऑक्टोबरला “महाराष्ट्राची हास्य जत्रा” फेम प्रसिद्ध मराठी कलाकार शिवाली परब आणि दिनांक 10 ऑक्टोबरला महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सिने अभिनेत्री सोनाली कुळकर्णी वणीकरासोबत सोबत गरबा खेळणार आहे.

गरबा उत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना बक्षीसांची लयलुट केल्‍या जाणार आहे. यामध्ये तीन गट असून प्रत्येक गटात दिमाखदार बक्षीस आहे. प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला इलेक्ट्रिक स्कूटर, वॉशिंग मशीन, सोन्याची नथ यासह उत्कृष्ट कॉस्ट्यूम स्पर्धकाला दररोज पैठणी भेट दिली जाणार आहे. गरबा महोत्सवात सहभागी स्पर्धकांना दररोज मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Img 20250103 Wa0009

राजे गरबा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. खेळणाऱ्यांसाठी आणि पाहणाऱ्यांसाठी निशुल्क सेवा दिली जाणार आहे. या भव्‍य गरबा महोत्सवात वणीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन “राजे गरबा उत्सवाचे” आयोजक आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग वणी आणि गौरीशंकर खुराना अध्यक्ष जनहित कल्याण संघटना यांनी केले आहे.
Rokhthok News