Home Breaking News Breaking… मविआचे हे असतील जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार..!

Breaking… मविआचे हे असतील जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार..!

● वणी, यवतमाळ, दारव्हा- दिग्रस मध्ये चुरस

C1 20241016 07265806
वणी, यवतमाळ, दारव्हा- दिग्रस मध्ये चुरस

SUNIL NAIK PATIL : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. महाविकास आघाडी व महायुतीने मोर्चेबांधणी केली आहे. काही जागांवर तिढा आहे, मात्र निवडणूक जिंकायचीच अशी रणनीती दोन्ही बाजूंनी आखण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मविआचे संभाव्य उमेदवार कोण असतील याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार काँग्रेस 4, शिवसेना (UBT) 2 तर राष्ट्रवादी (SP) 1 असे जागा वाटप होणार असल्याचे बोलल्या जात आहे. MVA will be the possible candidate in the district..!

विदर्भात काँग्रेसचा वरचष्मा आहे, विजयाची हमी असलेल्या उमेदवारालाच निवडणूक रिंगणात उतरवायचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले आहे. घराणेशाही आणि मतदारसंघाचा सात-बारा आपल्याच नावावर असल्याचे भासवणाऱ्यांना डच्चू मिळणार आहे. हरियाणा व अंतर्गत सर्व्हेचा धसका काँग्रेस पक्षाने घेतल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. घटक पक्षाच्या जवळ तुल्यबळ तगडा उमेदवार असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी वणी, दारव्हा- दिग्रस व यवतमाळ या तीन ठिकाणी चुरस आहे तर अन्यत्र घटक पक्षाचा प्रबळ दावा नाही. उमरखेड, आर्णी- केळापूर, राळेगाव व वणी या चार ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार असतील तर यवतमाळ व दारव्हा- दिग्रस शिवसेना (UBT) व पुसद राष्ट्रवादी (SP) च्या वाट्याला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Img 20250103 Wa0009

आघाडीचे संभाव्य उमेदवार !
राळेगाव- वसंत पुरके (काँग्रेस)
आर्णी- केळापूर- जितेंद्र मोघे (काँग्रेस)
उमरखेड- (काँग्रेस) तिढा कायम
वणी- संजय खाडे (काँग्रेस)
यवतमाळ- संतोष ढवळे (शिवसेना UBT)
दारव्हा-दिग्रस- सुनील महाराज (शिवसेना UBT)
पुसद- ऍड. आशिष देशमुख (राष्ट्रवादी SP)