● नागरिक सहन करतात म्हणून होतोय अतिरेक
Wani News | विधानसभेची निवडणूक आहे, आदर्श आचारसंहिता असतांना मूलभूत सोयी-सुविधा फाट्यावर मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. रवी नगर, जिजाऊ नगर, विठ्ठलवाडी ते नांदेपेरा मार्गावरील डीपी रोड, आनंद नगर आणि आमदार वास्तव्यास असलेल्या प्रभागातील पथदिवे रात्री बंद असतात. हा काय प्रकार आहे, असा संतप्त सवाल स्थानिक करताहेत. What is this, the street lights are off during the election period

पालिका प्रशासन सतत स्थानिकांना वेठीस धरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. कधी मानवनिर्मित पाणीटंचाई तर कधी पथदिव्याखाली अंधार ही बाब नवी नाही. परंतु ही वेळ आदर्श आचारसंहितेची आहे. निवडणूक कार्यक्रम असला तरी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने कर्तव्यतत्पर असणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधा याकडे लक्ष देणे प्राथमिकता आहे.
वणी शहरातील पथदिवे रात्री बंदावस्थेत का आहेत याबाबतचे कोडे उलगडत नसून पालिका प्रशासन झोपेत आहे का ? निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला तर प्रशासन जबाबदारी घेणार आहे का ? सध्यस्थीतीत पोलीस प्रशासन निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहे. पालिकेने तातडीने या गंभीर बाबीची दखल घ्यावी अन्यथा स्थानिकांच्या भावनांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
ROKHTHOK NEWS