Home Breaking News वाढता जनाधार, सर्वसामान्यांचा आधार

वाढता जनाधार, सर्वसामान्यांचा आधार

● झरीत दुमदुमला शिट्टीचा आवाज ● मुकुटबन येथे भव्य पदयात्रा

198
C1 20241112 08491060

झरीत दुमदुमला शिट्टीचा आवाज
मुकुटबन येथे भव्य पदयात्रा

Political News | सोमवारी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा मुकुटबन परिसरात प्रचार दौरा झाला. मुकुटबन, अडेगाव, वेळद, खडकी, खातेरा, येडशी या गावात प्रचार ताफा पोहोचला. मुकुटबन येथील रॅलीला हजारो लोकांनी सहभाग घेत संजय खाडे यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदारसंघात संजय खाडे यांचा वाढता जनाधार बघून तेच ठरतील सर्वसामान्यांचा आधार असे चित्र निर्माण झाले आहे. Independent candidate Sanjay Khade’s campaign tour in Mukutban area

Img 20250422 wa0027

आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ, चिखलगाव यांनी संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी सुधाकर गारगाटे, रमेश सुंकुरवार, दिगंबर गौरकर, अशोक झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमोद वासेकर वासुदेव विधाते, तेजराज बोढे, अशोक चिकटे, राजू अंकितवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Img 20250103 Wa0009

मुकुटबन येथून प्रचाराला सुरुवात झाली. मुकुटबन येथील रहिवाशांनी वाजत गाजत संजय खाडे यांचे स्वागत केले. यावेळी शिट्टीच्या आवाजाने संपूर्ण मुकुटबन दणाणून गेले. रॅलीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांचा समावेश होता. त्यानंतर कॉर्नर सभा झाली. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेरकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर प्रचार ताफा अडेगाव, वेळद, खडकी, खातेरा, येडशी या गावात पोहोचला.

मदतीला धावले बँक अभिकर्ते व कर्मचारी
संजय खाडे यांनी एकाही कर्मचारी किंवा एजंटकडून कोणत्याही प्रकारचे डोनेशन न स्वीकारता केवळ कर्तृत्वावर शेकडो कर्मचाऱ्यांना रोजगार दिला. त्यामुळे आम्ही कर्मचारी संजय खाडे यांचा प्रचार करणार असे पतसंस्थेतील कर्मचारी आणि अभिकर्ते यांनी जाहीर केले. यावेळी संजय खाडे सर्वांचे आभार मानत माझे दोनशे एजंट आणि 45 कर्मचारी जनसामान्यात जाऊन प्रचार करतील, असा विश्वास व्यक्त केला.

मंगळवारी संजय खाडे यांचा लाठी-शिंदोला सर्कलचा दौरा आहे. मंदर, केसुर्ली, चारगाव, वारगाव, पुरड, पुनवट, नायगाव, सावंगी, चिंचोली, शिवणी, येनाडी, कोलगाव, साखरा, माथोली, कैलाशनगर इत्यादी गावांचा दौरा आहे. कैलाशनगर येथे प्रचार सभा घेतली जाणार आहे.
Rokhthok News