Home Breaking News आज मनसे करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

आज मनसे करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

● वणी शहरात भव्य रॅलीचे आयोजन

354
C1 20241117 12044010

वणी शहरात भव्य रॅलीचे आयोजन

Political News | विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला. आजवर मविआ, महायुती, मनसे आणि अन्य उमेदवाराकडून जोरदार प्रचार करण्यात आला. तर स्टार प्रचारकांच्या सभा पाहता दोन ठाकरे बंधू सोडून वणीत भाजपचे आजवर कोणी फिरकले नाही. त्यामुळे ही लढत रंगतदार होणारं हे स्पष्ट झाले. MNS will make a strong show of strength today

शहरात मनसे व मविआ च्या उमेदवारांकडून आज शहरात रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी आज शहरांमध्ये शक्ती प्रदर्शनाचे आयोजन करत. आपल्या समर्थकांसह रॅली काढून मतदारांच्या भेटी घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात येत आहे.

दुपारी 2 वाजता शासकीय मैदानावरून ही रॅली मुख्य बाजारपेठ खाती चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी, टागोर चौक, आंबेडकर चौक अशी असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीची सांगता होणारं आहे. आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात पहिलेपासून आघाडी कायम ठेवली असून अंतिम टप्प्यात सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोरदार शक्ती प्रदर्शन करून मतदारांना आवाहन करणार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शहरातील ही रॅली वेधक असून या रॅलीने शहर मनसेमय होणारं असल्याचे बोलल्या जात आहे.
Rokhthok News