● विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेरले
Wani News | राज्यात गारठा वाढला आहे, त्यातच नागपुरला होत असलेले हिवाळी अधिवेशन तापले आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आ. संजय देरकर यांनी चक्क कापसाचे झाड दाखवत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव अधिक पन्नास टक्के नफा द्यावा अशी मागणी करत सभागृहाच्या पायऱ्यावर ठिय्या देत अनोखे आंदोलन केले. Guarantee price for agricultural products. MLA Derkar took the cotton tree and stayed in the legislature.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेरल्या जात आहे. बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता, सभागृहाच्या पायरीवर महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमीभाव अधिक पन्नास टक्के नफा घोषित करावा या करिता आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मविआ चे आमदार उपस्थित होते.
मागील दहा वर्षापासून केंद्रात व राज्यात डबल इंजनची सत्ता आहे. सत्ताधारी बेफाम पद्धतीने वागत आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना हमी भाव अधिक पन्नास टक्के नफा देवू म्हणून आश्वासन देणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.
शेतकऱ्यांची ना कर्ज माफी केल्या जात आहे, ना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिल्या जात आहे. शेतकऱ्यांचा लागत खर्च देखील निघत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. हे सरकार शेतकरी विरोधी धोरण आखून शेती हा व्यवसाय नष्ट करण्याचे षडयंत्र तर करत नाही ना अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी कापसाचे बोंडे भरलेले झाडच सभागृहाच्या पायऱ्यावर सत्ताधाऱ्यांना दाखवत ठिय्या देत आक्रमक घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नी त्यांनी उठवलेला आवाज सत्ताधाऱ्यांना ऐकू जावा एवढीच अपेक्षा शेतकरी बांधवांची आहे.
Rokhthok News