● पाच वर्षांपूर्वीचा थरार, पोलिसांची हत्या
Police News | मारेगांव तालुक्यातील हिवरी येथे पाच वर्षापुर्वी 26 नोव्हेंबर 2018 ला गैर जमानती वॉरंट घेवुन जाणाऱ्या पोलिसांवर आरोपीने हल्ला चढवला होता. यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, अथक प्रयत्नानंतर पोलीसांनी फरार आरोपीला जेरबंद केले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना न्यायमुर्तीनी विविध कलमान्वये दाखल गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. The accused had attacked the police who were going to get a non-bailable warrant.
अनिल लेतु मेश्राम, (49) रा. हिवरी, ता. मारेगाव असे आरोपींचे नांव आहे. त्याचेवर गैरजमानती वॉरंट असल्याने मारेगांव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राजेंद्र बाजीराव कुडमेथे, पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके व पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद खुपरे हे शासकीय वाहनाने हिवरी येथे गेले होते. आरोपीने अडथळा निर्माण करत निर्दयीपणे लाकडी दांडक्याने राजेंद कुडमेथे याचे डोक्यावर वार करुन जागीच ठार केले. तर अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवून जखमी केले होते.
याप्रकरणी पोलीस हवालदार मधुकर मुके यांचे तक्रारीवरुन विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यानी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. याप्रकरणी पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए. एम. देशमुख यांनी एकुन 9 साक्षीदार तपासले तर अभियोगपक्षातर्फे न्यायालायामध्ये सादर करण्यात आलेला सबळ पुरावा व सरकारी अभियोक्ता ऍड. रमेश मोरे यांचा युक्तीवाद ग्राहय धरण्यात आला.
याप्रकरणात न्यायालयाने दिनांक 24 डिसेंबर 2024 ला निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 6 महिन्यांचा सश्रम कारावास व ईतर गुन्हयाअंतर्गत सुनावलेली शिक्षा एकत्र भोगायचे असा आदेश पारीत करण्यात आले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास केला व पैरवी अधिकारी म्हणून ए.एस.आय दिपक गावंडे यांनी काम पाहिले.
Rokhthok News