Home Breaking News अखेर….बेपत्ता तरुणाचा मृतदेहच आढळला

अखेर….बेपत्ता तरुणाचा मृतदेहच आढळला

● गळफास लावून संपवले आयुष्य

816
C1 20241224 18122020

गळफास लावून संपवले आयुष्य

Sad News | तेली फैल परिसरात वास्तव्यास असलेला 28 वर्षीय तरुण बुधवार पासून बेपत्ता होता. अखेर रांगणा शिवारात सोमवारी वर्धा नदी काठावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. As he did not return home at night, a formal complaint was lodged with the police the next day.

अर्जून हरिभाऊ काळे (28) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो आपल्या भावासोबत तेली फैल परिसरात वास्तव्यास होता. मिस्त्री काम करून आपला उदरनिर्वाह करायचा. बुधवारी तो घरातून निघून गेला, रात्री घरी न परतल्याने दुसऱ्या दिवशी पोलिसात रीतसर तक्रार देण्यात आली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही.

Img 20250103 Wa0009

सोमवारी सायंकाळी रांगणा शिवारात वर्धा नदी काठावरील पिंपळाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला व कुजलेल्या अवस्थेतील सव उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आले. त्याने आत्महत्या केल्याचे कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Rokhthok News