● शिरपूर पोलिसांची कारवाई
Crime News | शेतकऱ्यांच्या शेतमालावर डल्ला मारणारे चोरटे तालुक्यात शिरजोर झाल्याचे दिसत आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात ठेवलेल्या 2 क्विंटल वजनी कापसाचे गाठोडे लंपास झाल्याची घटना 26 डिसेंबर ला घडली. तक्रारीअंती अवघ्या 24 तासात तीन आरोपींना गजाआड करत मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. In just 24 hours, three accused were arrested and the material was seized.
गिरीधर सिताराम मोहीतकार हे शेतकरी कुरई येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी गुरुवारी शेतातील कापसाची वेचणी केली. बैलबंडी न मिळाल्याने त्यांनी कापसाचे तीन गाठोडे शेतातच ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यावर त्यांना गाठोडे दिसून आले नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली, अखेर थेट पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली.
शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून आल्याने ठाणेदार माधव शिंदे यांनी तातडीने सूत्र हलवून तपास सुरू केला. गोपनीय बतमीदाराला कार्यान्वित करत तांत्रिकदृष्ट्या तपासावर भर देत 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
आसीक शेख ईब्राहीम शेख (32),वैभव मारोती मडकाम (24) व शिवाजी उर्फ मिथुन विठठल मरसकोल्हे (32) हे तिघेही रा. कुरई यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व दोन क्विंटल कापूस असा एकूण 75 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवंत, गंगाधर घोडाम, विनोद काकडे यांनी पार पाडली आहे.
Rokhthok News