Home Breaking News कोळसाखान परिसरात आढळला मृतावस्‍थेतील वाघ

कोळसाखान परिसरात आढळला मृतावस्‍थेतील वाघ

● कामगारांनी सोडला सुटकेचा श्वास

1482
C1 20250107 16023249

कामगारांनी सोडला सुटकेचा श्वास

Wani News | तालुक्‍यातील उकणी कोळसा खाणीच्‍या परिसरात मंगळवार दिनांक 7 जानेवारीला सकाळी 7 वाजताच्‍या दरम्‍यान मृतावस्‍थेतील पट्टेदार वाघ आढळुन आला. कोळसा खाणीत कामावर जाणाऱ्या कामगारांना मृत वाघ दिसताच कामगारांनी सुटकेचा श्वास सोडला. A dead tiger was found in the coal mine area

उकणी खदाणीत पहिल्‍या पाळीत काम करणारे कामगार सकाळी कर्तव्‍यावर जात असतांना त्‍यांना मृत वाघ दिसला. ही वार्ता परिसरात पसरल्‍याने बघ्‍यांची मोठी गर्दी झाली. तीन ते चार वर्षाचा वाघ असावा असे बोलल्‍या जात असुन त्‍याचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला याचा तपास वन विभाग करताहेत. मृत वाघ त्‍याच परिसरात भ्रमण करत असावा असे बोलल्‍या जात आहे. दोन महिन्‍या पुर्वी कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांना त्‍या वाघाचे दर्शन सुध्‍दा झाले होते.

Img 20250103 Wa0009

वाघाचा मृत्‍यू दहा दिवसा पुर्वी झाला असावा, कारण त्‍याचे शव पुर्णतः कुजलेल्‍या अवस्‍थेत होते. वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांनी घटनास्‍थळी धाव घेत पंचनामा केला. त्‍यानंतर मृत वाघाला मंदर येथे आणण्‍यात आले असुन शवविच्‍छेदन करण्‍यात येणार आहे. वाघाचा मृत्‍यू नेमका कशाने झाला हे उत्तरीय तपासणी नंतरच स्‍पष्‍ट होणार आहे.
Rokhthok News