Home Breaking News व्यसनमुक्ती सप्ताहात भाविकांची मांदियाळी

व्यसनमुक्ती सप्ताहात भाविकांची मांदियाळी

● विविध कार्यक्रमांची रेलचेल

379
C1 20250109 11520410

विविध कार्यक्रमांची रेलचेल

Wani News | शिंदोला येथे 5 ते 11 जानेवारी या कालावधीत श्रीमद भागवत, ज्ञानयज्ञ व व्‍यसनमुक्‍ती सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले. परिसरातील भाविक भक्‍तांची अलोट गर्दी बघावयांस मिळाली. सकाळ पासुन राञी पर्यंत चालणारे विविध कार्यक्रम उत्‍साह निर्माण करणारे आहेत. संजय निखाडे माउली परिवार, गुरुदेव सेवा मंडळ यांच्‍या वतीने आयोजीत सप्‍ताहात व्यसनमुक्ती सम्राट भागवताचार्य ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे यांचे अमृतमय वाणीने श्रोते भारावून जाताहेत. Vyasanmukti Saptah organized at Shindola from 5th to 11th January.

C1 20250109 11531417

समाजा प्रती आपली बांधीलकी जपत माऊली परिवार व गूरूदेव सेवा मंडळ सातत्‍याने सर्वसमावेशक, भक्‍तीमय तसेच व्‍यसनमुक्‍तीचे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. सर्व प्रथम 2016 मध्‍ये सुरु करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमांची परंपरा अद्याप कायम आहे. ह.भ.प. रामेश्वर खोडे  महाराज यांच्‍या अवर्णनिय किर्तनाने उपस्थित भाविक भारावून जाताहेत. अनेकांनी आपले व्‍यसन महाराजांच्‍या झोळीत टाकत व्‍यसनमुक्‍तींचा संकल्‍प केला आहे.

Img 20250103 Wa0009

व्यसनमूक्ती व भागवत सप्ताहाच्‍या माध्यमातून ग्रामस्‍थांनी व्यसनमूक्त व ग्रामस्वच्छता  संकल्‍पना राबवावी व आपल्या गावाला व्यसनमूक्त स्वच्छ ठेऊन संतानी दीलेल्या संदेशाचे काटेकोर पालन करावे. असा संदेश यावेळी शिवसेनेचे उप जिल्‍हा प्रमुख तसेचे आयोजक संजय निखाडे व माऊली परिवार शिंदोला व गूरूदेव सेवा मंडळ यांनी समस्‍त ग्रामस्‍थांना दिला.

शिंदोला येथील बोबडे लेआऊट येथे दुपारी 1 ते 4 भागवत कथा होते तर दैनंदिन कार्यक्रम सकाळी 6 वाजता ध्यानपाठ, सकाळी 7 वाजता ग्रामसफाई, सायंकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना होत आहे. 11 जानेवारीला सकाळी ग्रंथदिंडी, दुपारी काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजक म्हणून संजय निखाडे, बापूजी साळवे, हरिभाऊ गोरकर, किशोर किनाके, शांतीलाल जैन, किशोर पिंपळशेंडे, गणेश ठाकरे, गणेश नैताम, मनोज काळे, दत्ता ठाकरे, पठाण भाई, जलौद्दिन सयद, नंदू गिरी, चंदू गिरी, शंकर धगडी, अतुल बलकी, यादव दाहकी, यादव सुर व ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
Rokhthok News