Home Breaking News धक्कादायक… बच्चेवार सरांचे निधन

धक्कादायक… बच्चेवार सरांचे निधन

● उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास

2344
C1 20250116 21501528

उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास

Sad News | अतिशय सोज्वळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेले राजेंद्र बच्चेवार यांना ओळखल्या जाते. त्यांचे गुरुवारी सायंकाळी अमरावती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाने चांगलीच शोककळा पसरली आहे. His sudden death has been widely mourned.

शिक्षक ते पत्रकार म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती. त्यांचे विध्यार्थी वर्गावर चांगलेच प्रेम होते. ज्या शाळेत त्यांनी कर्तव्य बजावले तेथे त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. पत्रकारिता करताना त्यांनी झरी सारख्या आदिवासी बहुल विभागात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा याकरीता विविध बातम्याच्या माध्यमातून कार्य केले आहे.

Img 20250103 Wa0009

राजेंद्र बच्चेवार हे उत्कृष्ट वक्ते आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. ते आदर्श हायस्कूल साखरा (को.) येथील प्रभारी मुख्याध्यापक होते. त्यांच्या अनपेक्षित निधनाने मित्रपरिवार व नातेवाईक मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचेवर उद्या शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)