Home Breaking News आणि…..वेकोलीच्या चार कर्मचाऱ्यांना अटक

आणि…..वेकोलीच्या चार कर्मचाऱ्यांना अटक

● वन विभागाची दणदणीत कारवाई ● मृतावस्थेतील वाघाचे दात व नखं हस्तगत ● अमरावतीचे पथक वणीत दाखल

2508
C1 20250117 19020571
वन विभागाची दणदणीत कारवाई
मृतावस्थेतील वाघाचे दात व नखं हस्तगत
अमरावतीचे पथक वणीत दाखल

Wani News | तालुक्‍यातील उकणी कोळसा खान परिसरात दिनांक 7 जानेवारीला मृतावस्‍थेतील पट्टेदार वाघ आढळुन आला होता. त्याची नखे व दात घटनास्थळी दिसून आले नाही. यामुळे वाघाची शिकार तर केली नाही ना असा कयास वर्तवत वन विभागाने तपासाची दिशा ठरवली, या दरम्यान अमरावती वरून पथक दाखल झाले. तपासात गोपनीयता बाळगत वेकोलीचे चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत वाघाची नखे व सुळे दात हस्तगत करण्यात आले आहे. Four employees of WCL have been detained and the claws and teeth of the tiger have been seized.

सतीश अशोक मांढरे (26) रा. वणी, नागेश विठ्ठल हिरादेवें (40) उकणी, आकाश नागेश धानोरकर (27) वणी, रोशन सुभाष देरकर (28) उकणी असे अटकेतील वेकोली कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मृतावस्थेतील वाघ दिसताच त्यांनी वाघाचे सुळे व नखं लंपास केली होती. या प्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई केली आहे.

Img 20250103 Wa0009

उकणी कोळसा खाणीच्‍या परिसरात 7 जानेवारीला सकाळी 7 वाजताच्‍या दरम्‍यान कुजलेल्या अवस्थेतील मृत वाघ प्रत्यक्षदर्शीला दिसला. ही वार्ता कोळसा खान परिसरात पसरली. वन विभागाला घटनेची माहिती कळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मंदर येथे वाघावर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडण्यात आले.

वाघाचा मृत्यू विजेच्या धक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. शव विच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण उघड होईलच मात्र घटनास्थळी वाघाची नखं व दात आढळून आले नाही. यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासाची दिशा ठरवली. गोपनीय सूत्रांना सतर्क करत तपास करत असताना वेकोलीतील निलजई खदाणीत काम करणारे चार कर्मचारी वन विभागाच्या रडार वर आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष देशमुख व कर्मचारी यांनी सूत्रबद्ध तपास यंत्रणा राबवली तर अमरावती येथील पथकाने तपासाची दिशा ठरवली. वन विभागाने केलेल्या कारवाईत चार वेकोली कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत नखं व सुळे दात हस्तगत केले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
Rokhthok News