Home Breaking News “हिंदुत्व एक जीवनशैली” मांडले परखड मत

“हिंदुत्व एक जीवनशैली” मांडले परखड मत

● विविध कार्यक्रमांचे आयोजन ● वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

C1 20250123 19532209

विविध कार्यक्रमांचे आयोजन
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

Wani News | हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यावाचस्पती डॉक्टर स्वानंद पुंड यांनी “हिंदुत्व एक जीवनशैली”यावर परखड मत मांडले. शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Venerable Balasaheb Thackeray’s birth anniversary was celebrated with enthusiasm.

सर्वप्रथम हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले,. त्यानंतर युवा सेनेच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. शेतकरी मंदिर येथे डॉ. स्वानंद पुंड यांचे “हिंदुत्व एक जीवनशैली” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी हिंदुत्व काय ? यावर परखड मत मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवसेनेच्या सदस्य नोंदणी चा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जि प सदस्य बंडू चांदेकर, उप जिल्हा प्रमुख सुधाकर गोरे, बजरंग दल चे संतोष लकशेट्टीवार, विक्रांत चचडा, माजी जि प सदस्य सुनील गेडाम, प्रसाद ठाकरे, संजय आवारी, चंद्रकांत घूग्गुल, महेश चौधरी, राजु खामणकर, सीमा आवारी, स्वाती कोंगरे, भाग्यश्री वैद्य, स्मिता नांदेकर, विक्की चवणे, युवराज ठाकरे, राहुल पारखी, सुवर्णा थेरे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009