● ती…खाजगी शाळाच जबाबदार
● पालकवर्ग कमालीचे संतप्त
Sad News | शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहचविणाऱ्या ऑटोचा अपघात झाला. या घटनेत एका लहानग्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीला सकाळी 7:30वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने खाजगी शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून सर्वस्वी शाळाच जबाबदार आहे. Student killed in accident, private school responsible..!

सौरव भिका राठोड (13) असे दुर्दैवी मृतक बालकाचे नाव आहे. तो पुसद शहरातील एका खाजगी शाळेत इयत्ता 7 वी मध्ये शिकत होता. तसेच तो तालुक्यातील दहिवड येथे वास्तव्यास होता. दररोज ऑटोने तो शाळेत जायचा. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तो सकाळी ऑटो क्रमांक (MH- 29- V- 8976) ने शाळेत जाण्यासाठी निघाला.
शाळेत पोहचण्यापूर्वी साई मंदिर परिसरात दोन ऑटोची परस्परविरोधी जबर धडक झाली. बेधुंद वाहन हाकण्याच्या धडपडीत झालेला अपघात भीषण होता. यात निष्पाप बालकाचा बळी गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. आणि बालकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
घडलेली घटना अतिशय विदारक असून या प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी उमरखेड मध्ये सुद्धा घडली होती. खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेची आहे. त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. त्या प्रमाणेच ऑटो चालक हा शालेय विद्यार्थ्यांची ने-आन कोणाच्या परवानगीने करत होता हे तपासणे गरजेचे आहे.
Rokhthok News