Home Breaking News Birth Anniversary of Lord Sri Rama : रामरथ, रामपालखी, घोडे आणि ‘लाईव्ह...

Birth Anniversary of Lord Sri Rama : रामरथ, रामपालखी, घोडे आणि ‘लाईव्ह हनुमान’

● देवी, देवतांचे देखावे प्रमुख आकर्षण ● राम नवमी उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन

C1 20250401 09380140

देवी, देवतांचे देखावे प्रमुख आकर्षण
राम नवमी उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन

Wani News | दरवर्षीप्रमाणे या वर्षीही, दिनांक 6 एप्रिल, रविवारला प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समिती तर्फे भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून वणीमध्ये ही परंपरा कायम आहे. रामरथ, रामपालखी, घोडे आणि ‘लाईव्ह हनुमान’ तसेच देवी, देवतांचे देखावे प्रमुख आकर्षण असेल. Birth Anniversary of Lord Sri Rama प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त वणी येथे भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. On the occasion of the birth anniversary of Lord Shri Ram, a grand procession will be held at Wani.

या शोभायात्रेमध्ये विविध देखावे असणार आहेत – अयोध्येतील रामलल्लांची देखणी मूर्ती, श्रीकृष्ण, भगवान शंकर आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच, वणी शहराला भजनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी “शेगावच्या श्री गजानन महाराज देवस्थानच्या भजन मंडळीसह” विविध ठिकाणांहून आलेली भजनी मंडळी आपली कला सादर करणार आहेत. याशिवाय, रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे. विशेष आकर्षण म्हणून हरियाणातील ‘लाईव्ह हनुमान’ देखील या शोभायात्रेत सहभागी होणार आहे.

6 एप्रिल रोजी संपूर्ण वणी शहर भगवामय होईल. चौका-चौकात रांगोळ्यांनी सजावट केली जाईल. जुनी स्टेट बँक जवळील राम मंदिर येथे संध्याकाळी 5 वाजता प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल. ही शोभायात्रा राम मंदिर (जुनी स्टेट बँक) येथून सुरू होऊन श्याम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्ग, श्री रंगनाथ मंदिर चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सरोदे चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक मार्गे पुन्हा राम मंदिर येथे पोहोचेल आणि महाआरतीने समारोप होईल. तरी वणीकर नागरिकांनी तसेच रामभक्तांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री प्रभू राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केले आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009
Previous articleएकाला मारहाण, तिघांवर गुन्हा नोंद
Next articleKabaddi : वणीत रंगणार कबड्डीचा थरार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.