Home Breaking News Very Sad : दोन घटनेत दोघांची आत्महत्या

Very Sad : दोन घटनेत दोघांची आत्महत्या

● शिरपूर हद्दीत युवतीने तर चिखलगाव येथे एकाने गळफास लावून संपवले आयुष्य....

C1 20250418 20275935
शिरपूर हद्दीत युवतीने तर चिखलगाव येथे एकाने गळफास लावून संपवले आयुष्य….

Sad News : शुक्रवार घातवार ठरल्याचे दिसत आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरड (पुनवट) येथील 25 वर्षीय युवतीने दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावला तर शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे 55 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. Very Sad: Suicide of two in two incidents

सविस्तर वृत्त असे की, पुरड (पुनवट) येथील पायल बालाजी उरकुटे (25) या तरुणीने घरी कोणीच नसल्याची संधी साधून घराच्या आडयाला दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी पायल चे आई-वडील शेतात गेले होते. घरी कोणीच नसल्याचे हेरून तिने आत्मघाती निर्णय घेतला. ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी एकाच कल्लोळ केला. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही.

दुसऱ्या घटनेत चिखलगाव येथे वास्तव्यास असलेले संभा बापुराव निकोडे (55) यांनी घटनेच्या दिवशी सकाळी आपल्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांनी पोलिसांना सूचित केले. तोपर्यंत बघ्याची मोठी गर्दी जमा झाली होती. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009