Home Breaking News भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

● गुलाम रसूल रंगरेज यांनी जपली सामाजिक बांधिलकी

C1 20250419 11551044

गुलाम रसूल रंगरेज यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Wani News : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह सोमवारी वणीत मोठ्या प्रमाणात दिसून आला. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. सायंकाळच्या सुमारास शहरातून मिरवणूक निघाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल रंगरेज, आतिफ रंगरेज यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले. त्यांनी नारायण निवास जवळ पाणी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गुलाम रसूल रंगरेज यांनी इजहार शेख यांच्या उपस्थितीत एसडीपीओ गणेश किंद्रे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. The excitement of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्या पाहता या परिसरात विविध प्रकारची दुकाने सजली होती. निळे व पंचशिलाचे झेंडे नागरिकांचे लक्ष वेधत होते. याशिवाय गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या विविध भावमुद्रेतील मूर्ती परिसरात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके व बुद्ध धम्माची पुस्तके विविध दुकानदारांनी या परिसरात विक्रीसाठी ठेवली होती.

सायंकाळी शहरातील मनिषनगर, दामले फैल, गायकवाड फैल, विठ्ठलवाडी, भीमनगर, पंचशील नगर, सम्राट अशोकनगर, रंगनाथनगर, वागदरा आदी ठिकाणची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणुकीत डीजे, लेझीम पथक व आकर्षक देखावे होते. मिरवणुकीतील नागरीकांसाठी शहरात ठिकठिकाणी शरबत, अल्पोपहाराचे स्टॉल लागले होते.

Img 20250103 Wa0009

भीम टायगर सेना, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. नारायण निवास जवळ सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल रंगरेज यांनी मिरवणूक रॅलीचे जोरदार स्वागत केले. रात्री आंबेडकर चौकात सामुहिक वंदनेने मिरवणुकीची सांगता झाली.
Rokhthok News