Home Breaking News Top student : दहावीत “नक्षत्र” तर बारावीत “पल्लवी”

Top student : दहावीत “नक्षत्र” तर बारावीत “पल्लवी”

● स्वर्णलीलाने राखली यशस्वी परंपरा

C1 20250514 22522451

स्वर्णलीलाने राखली यशस्वी परंपरा

Wani News | केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या निकालात स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. बारावीमध्ये पल्लवी पेटकर हिने 90.00% गुणांसह तर दहावीमध्ये नक्षत्र पाटनकर याने थक्क करणारे 99.20% गुण मिळवत तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावला. Swarnalila International School continues its successful tradition this year too

नुकतेच 13 मे रोजी जाहीर झालेल्या सीबीएसई निकालात शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल कामगिरी केली. विशेष म्हणजे दहावीच्या 36 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवत शाळेचा नावलौकिक वाढविला.

या गौरवप्रसंगी शाळेचे संस्थापक डॉ. नरेंद्र रेड्डी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाने शाळेतील प्राचार्य शामसुंदर रेड्डी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान अधोरेखित झाले आहे.

Img 20250103 Wa0009

स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या स्वर्णलीला शाळेच्या या यशाची दखल सर्व स्तरांतून घेतली जात असून, विद्यार्थ्यांनी मिळवलेली ही कामगिरी भविष्यातील यशाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Rokhthok News