● हरफनमौला फोटोग्राफर हरपला
Sad News : सतीश उर्फ सोमु रमेश बिलोरिया यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 44 वर्षाचे होते, ही दुर्दैवी घटना बुधवार दिनांक 25 जूनला सकाळी 11 वाजता घडली. Tragic: Somu Biloria passes away
सोमु, हरफनमौला फोटोग्राफर होता. दिलखुलास व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात होता. घटनेच्या दिवशी सकाळी त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करायला नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
सोमु यांचे पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी व मुलगा आहे. त्यांच्या अनपेक्षित निधनाने बिलोरिया परिवार व मित्रमंडळी शोकसागरात बुडाले आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)






