Home Breaking News तर…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर ….!

तर…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर ….!

● मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा, जिल्हाध्यक्षाचा संकल्प..... ● "संकल्प से सिद्धी तक" या अभियानाची दिली माहिती

C1 20250629 19140082

मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा, जिल्हाध्यक्षाचा संकल्प…..
“संकल्प से सिद्धी तक” या अभियानाची दिली माहिती

Political News :
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चव्हाण हे प्रथमच वणी शहरात आले होते. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली तर पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात युतीचे सरकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर युती होईलच मात्र स्थानिक ठिकाणी येनकेन प्रकारे युती तुटलीच तर भाजपा स्वबळावर निवडणुका लढणार असे स्पष्ट केले. Local government elections will be contested on their own.

आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, मंगला पावडे, मीरा पोतराजे, संतोष डंभारे, श्रीकांत पोटदुखे, ऍड. निलेश चौधरी व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना ऍड. चव्हाण म्हणाले की, भाजपचे जिल्ह्यात संघटन मजबूत आहे. यावेळी मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा फडकवणारच असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळातील “संकल्प से सिद्धी तक” या अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रविवारी पत्र परिषदेचे आयोजन शेतकरी मंदिर येथे करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चव्हाण यांनी सरकारने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत “सेवा, सुशासन, गरीब कल्याण” या संकल्पनेतून राबविलेल्या अभियानाची माहिती दिली.

Img 20250103 Wa0009

मनसेचा जल्लोष : मराठीच्या लढ्याला यश! हिंदी सक्ती रद्द

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात ऐतिहासिक विकास घडल्याचा दावा यावेळी करण्यात आला. गरीबांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी विविध योजना राबवण्यात आल्याचे ऍड. चव्हाण यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास भाजपच्या लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे दिसत असून माजी आमदार बोदकुरवार यांनी मतदारसंघात तर माजी नगराध्यक्ष बोर्डे यांनी शहरात मोठी विकासकामे केल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या योजनेमुळे देशभरात गरीब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News