● शहराध्यक्षपदी ऍड. निलेश चौधरी
Political News :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या Local Body Elections निवडणुकांचा विचार करता भारतीय जनता पक्षाने वणी शहरात नव्या नेतृत्वाच्या रूपात मोठा शिलेदार उभा केला आहे. भाजप शहराध्यक्षपदी ऍड. निलेश चौधरी यांची निवड करून आक्रमक रणनितीची सुरुवात भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केल्याचे दिसून येत आहे. Local Body Elections: BJP’s aggressive strategy…
वणी शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक ऍड. निलेश माया महादेवराव चौधरी यांची भाजपा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नवचैतन्याची लाट उसळली आहे. वकिली क्षेत्रात यशस्वी आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रणी असलेले ऍड. चौधरी हे नव्या पिढीतील विश्वासार्ह आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी, मित्रपरिवार व रॉयल फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी शहराच्या राजकारणात होणाऱ्या घडामोडी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात परिणाम घडवतात. त्यामुळेच भाजपने यंदा अनुभवी, लोकप्रिय आणि आक्रमक नेतृत्वावर विश्वास ठेवत ऍड. निलेश चौधरी यांना पुढे केले आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व तत्सम निवडणुकांमध्ये त्यांचा अनुभव व प्रभाव भाजपला निश्चितच बळ देणार असे दिसून येत आहे.
Rokhthok News






