Home Breaking News खरंच…..पर्यावरणाची जाण असणारा सरपंच असावा तर असाच..!

खरंच…..पर्यावरणाची जाण असणारा सरपंच असावा तर असाच..!

● "हरित गाव" सरपंच छोटू राऊत यांची संकल्पना, अहेरअल्ली ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम

C1 20250808 21510245
“हरित गाव” सरपंच छोटू राऊत यांची संकल्पना, अहेरअल्ली ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम

Good News :
पर्यावरण संवर्धन, स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ग्रामपंचायत अहेरअल्ली च्या वतीने “प्रत्येक कुटुंब एक केशर आंबा झाड” हा उपक्रम राबवण्यात आला. या अभिनव उपक्रमाची संकल्पना व यशस्वी अंमलबजावणी सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. Really…..if there should be a Sarpanch who is aware of the environment, then this is what it should be like..!

सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांच्या दूरदृष्टीतून ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, युवक मंडळ, महिला बचत गट आणि समस्त ग्रामस्थांनी एकजुटीने या महत्वपूर्ण उपक्रमात सहभाग घेतला आणि हा उपक्रम एक चळवळ बनवली. अहेरअल्ली गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरासमोर किंवा शेतात एक केशर आंब्याचे झाड लावावे अशी विनंती ग्रामस्थांना करण्यात आली आहे.

आंब्याचे रोप मोफत देण्यात येणार असून, झाडांची जबाबदारी संबंधित कुटुंबांनी स्वतः घेणे अपेक्षित आहे. झाडांची योग्य प्रकारे निगा आणि संरक्षण करण्याची जबाबदारी त्या कुटुंबाची असेल. झाडाला लागणारे फळ त्या कुटुंबियांच्या मालकीचे असेल. भविष्यात पर्यावरण पूरक गाव निर्मितीस यामुळे मदत होणार आहे.

Img 20250103 Wa0009

हा उपक्रम केवळ झाड लावण्यापुरता मर्यादित न राहता, पर्यावरणप्रेम, जबाबदारी, आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरतो आहे. लावलेले झाड केवळ फळ देणारे नाही, तर आमच्या पुढच्या पिढीसाठी हरित वारसा देणारे ठरणार आहे. “एक झाड… अनेक फायदे” या संकल्पनेला अनुसरून अहेरअल्ली गाव पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक आदर्श उभा करत आहे.

या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सकल ग्रामस्थांचे, पदाधिकाऱ्यांचे, आणि विशेषतः नेतृत्व करणाऱ्या सरपंच हितेश राऊत यांचे परिसरात कौतुक होत आहे. तसेच उप सरपंच अनिल विठोबा राऊत, सदस्य गजानन नरहरी सिडाम, अमृता हितेश राऊत, पुष्पा बंडू राऊत, मनीषा योगेश दुधकोहळ व सविता संजय मन्ने यांनी विशेष परिश्रम घेतले.

निवृत्त शिक्षक सुधाकर राऊत, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शंकर केमेकार सर, नायब तहसीलदार मसराम, बनपेलवर सर, कृषी सहाय्यक ताटे साहेब, रिवास भोयर, रोहित राऊत, तलाठी चांदेकर साहेब, मंडळ अधिकारी ऋषी राऊत यांचे या उपक्रमाला महत्वपूर्ण सहकार्य लाभले.
rokhthok